अखेर ‘शिवसेना’ एनडीएतून ‘बाहेर’, आता स्थानिक स्वराज संस्थांच्या ‘युती’चं काय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना आणि भाजप यांच्यातील राज्यातील वादाचा परिणाम केंद्रात पाहायला मिळाला. बऱ्यात वेळापासून सांगण्यात येत होते की शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार, अखेर एनडीएतून शिवसेना बाहेर पडली आहे. या घटनेनंतर आता राज्यातील युतीचे काय अशी देखील चर्चा सुरु झाली आहे. राज्यात देखील भाजप शिवसेनेत काडीमोड होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

एकीकडे राज्यात राजकीय उलथापालथी सुरु असताना केंद्रात देखील त्याचे पडसाद उठले. शिवसेनेचे खासदार आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी आपला राजीनामा दिला आहे. त्यासंबंधित त्यांनी ट्विट वर माहिती देखील दिली होती. त्यानंतर अखेर त्यांनी आपला राजीनामा दिला.

राज्यात आज राजकीय घडमोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्रिपद कोणाकडे यावरुन भाजप शिवसेनेत चांगलाच कलगीतुरा सुरु होता. त्यानंतर फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप शिवसेनेकडून एकमेकांवर खोटारडेपणाचे आरोप लावण्यात आले. त्यानंतर युतीत बिनसलं याची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत होते. त्यानंतर आता महायुती नाही महाशिवआघाडी सत्तास्थापन करणार का यावर चर्चा सुरु झाली आहे. कारण सत्ता समीकरणाची गणिते जुळवण्यास शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सत्ता स्थापनेची खलबत सुरु आहेत.

Visit : Policenama.com