अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीविरोधात पोलिसांनी दाखल केली FIR

पोलिसनामा ऑनलाइन –महाराष्ट्रातील औरंगाबादमधील एका व्यक्तीनं अभिनेत्री कंनगा रणौतची बहिण रंगोली चंदेल हिच्या विरोधात समुदायांमध्ये तिरस्कार पसरवण्याच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. त्यांनी पैलवान बबीता फोगाटविरोधातही केस दाखल केली आहे.

एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, तबलिगी जमातीशी संबंधित एका व्यक्तीनं गुरुवारी सिटी चौक ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी सांगितलं की, ही तक्रार औरंगाबादच्य आयुक्तांद्वारा त्या त्या भागातील पोलिसांना पाठवण्यात आली जिथे त्या दोघी राहतात.

अधिकाऱ्यानं सांगितलं की, तक्रारदारानं फोगाटनं 15 एप्रिपल रोजी केलेल्या ट्विटचा हवाला दिला. त्यानं आरोप केला की, रंगोलीनं 15 एप्रिल रोजी केलेल्या ट्विटचा हेतू एका समुदायातील लोकांना निशाणा बनवण्याचा हेतू होता. फोगाट आणि चंदेल यांच्या विरोधात कलम 153 ए आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

या सगळ्या वादानंतर रंगोली चंदेलचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं होतं. यानंतरही खूप वाद झाला होता. अनेकानी रंगोलीची बाजू घेत आवाज उठवला होता. लोकांचं म्हणणं होतं की, तिला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळं ट्विटरनं असं करायला नको होतं. सिंगर सोना महापात्रानंही रंगोलीची बाजू घेतली होती.