अहमदाबादमधील कपड्यांच्या गोदामामध्ये लागली आग, 9 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  गुजरातच्या अहमदाबादमधील कपड्यांच्या गोदामामध्ये आग लागली आहे. आगीनंतर इमारतीत स्फोट झाल्यामुळे छप्पर कोसळले आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली 5 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आग विझविण्यासाठी अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदत व बचाव कार्य सुरु आहे. नानुकाका इस्टेट येथील कपड्यांच्या गोदामात ही आग लागली आहे.

अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गोदामाशेजारी असलेल्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्यामुळे ही आग लागली. या घटनेत 6 जणांना वाचविण्यात आले असून, त्यातील एकाची प्रकृती चांगली असून बाकीच्या लोकांची स्थिती गंभीर किंवा मृत असू शकते. 12 अग्निशमन यंत्रणा आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत.