घोडगंगा साखर कारखान्यात आग, बगॅस जळून नुकसान

पुणे/शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला आग लागुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की येथील कारखान्याच्या सहविजनिर्मीती प्रकल्पाच्या शेजारी असणाऱ्या बगॅस डेपोला अचानक आग लागली असल्याचे लक्षात आले. कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ऊन व वाऱ्यामुळे आगीने उग्र रुप धारण केले. त्यामध्ये सहविजनिर्मीतीसाठी बगॅस वाहून नेणारा रबरी बेल्ट पेटल्यामुळे परिसरात धुराचे लोट दिसु लागले होते.

दरम्यान घोडगंगा कारखान्याचे अग्नीशमन दल सतर्क असल्यामुळें आग लवकर आटोक्यात आली त्यानंतर रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमनदलाची गाडी मदतीला आल्यामुळे एक तासाभरात आग विझविण्यात यश आले.याबाबत कारखान्याचे अध्यक्ष अँड अशोक पवार यांच्याशी संपर्क साधला असता कारखान्याचा बगँस व सहविजनिर्मीतीसाठी बगँस वाहून नेणारा बेल्ट जळुन नुकसान झाले आहे.

Visit : Policenama.com