सर्वप्रथम प्रेमात ‘आंधळ’ केलं, नंतर नाही तेवढया ‘अश्लील’ फोटो काढून धर्म बदलण्यास करू लागला ‘ब्लॅकमेल’

जोधपुर : वृत्तसंस्था – राजस्थानच्या जोधपुरमधील बिलाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धर्म परिवर्तन करण्याचे प्रकरण समोर आले आहे. यावरून येथे तणाव निर्माण झाला आहे. माहितीनुसार, आरोपी शाहरुखने एका तरूणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. हैराण करणारी बाब ही आहे की, त्याने तरूणीला आपले खरे नाव सांगितले नाही. तरूणी त्यास रवि नावाने ओळखत होती. एक दिवस भेटण्याच्या बहाण्याने शाहरुखने तिला बोलावले आणि अश्लील चाळे करू लागला. अगोदर तिला ही थट्टा वाटली, यामुळे जास्त विरोध केला नाही. यामुळे आरोपीचे धैर्य वाढले.

काही महिन्यांपूर्वी पीडितेचा वाढदिवस होता, तेव्हा तरूणाने बर्थडे सोबत साजरा करण्यासाठी तिला गार्डनमध्ये बोलावले. पीडित तरूणी तेथे पोहचली असता त्याने अगोदर तिला फुले देऊन नंतर कोल्ड ड्रिंक पाजले. जे पिताच तरूणी बेशुद्ध पडली, यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आणि त्याचे फोटो-व्हिडियो सुद्धा बनवले. जेव्हा पीडितेला शुद्ध आली, तेव्हा बीपी वाढल्याने चक्कर आल्याचे सांगितले. यादरम्यान पीडितेला समजले की, ज्यास ती रवि समजत आहे, तो शाहरूख आहे.

यानंतर पीडिता त्याच्यापासून लांब राहू लागली, परंतु आरोपी तिचा सतत पाठलाग करत होता. त्याने तिचे फोटो-व्हिडियो व्हायरल करण्याची धमकी देऊन धर्म परिवर्तन करून त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी दबाव आणला. भितीने पीडितेने याबाबत कुणालाही काही सांगितले नाही. यानंतर आरोपीने पीडितेला फोन करून रेपचा व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली. ती ऐकत नसल्याचे पाहून तिच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी दिली. सतत ब्लॅकमेलिंगने छळ सुरू असल्याने पीडितेने आपल्या आईला सर्व प्रकार सांगितला. दुसर्‍या दिवशी जेव्हा पीडिता आईसोबत निघाली तेव्हा आरोपी शाहरूखने आई-मुलगी दोघींना धर्म परिवर्तन करून लग्न करण्याची धमकी दिली. दोघीजणी ओरडू लागल्याने लोक जमले आणि शाहरूखला पकडले. आरोपीच्या विरूद्ध ब्लॅकमेलिंग, रेप आणि धर्म परिवर्तनासाठी दबाव आणल्याची केस दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.