मराठवाड्यात प्रथमच CNS महिला जिम ! मिस एशिया इस्टेला गोडे यांच्या हस्ते उद्घाटन

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – सध्याच्या धावपळीच्या काळात महिलांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी व्यायाम आवश्यक असून महिलांच्या तंदुरूस्तीसाठी मराठवाड्यातील पहिलीच सी.एन.एस.महिला जिमचे उद्घाटन मिस एशिया इस्टेला गोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

बीडमध्ये डॉ. इलियास खान यांनी महिलांच्या फिटनेससाठी सी.एन.एस.महिला जिमची अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने उभारणी केली असून ही मराठवाड्यातील पहिलीच महिलांसाठी जिम ठरणार आहे. या जिमचे उद्घाटन मिस एशिया इस्टेला गोडे यांच्या हस्ते उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले.

यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू मुझफ्फर शेख, जुबेर शेख, आकाश औटे यांच्यासह डॉ. प्राचार्य दिपाताई क्षीरसागर, डॉ. सारिकाताई क्षीरसागर, अ‍ॅड. सांगिताताई चव्हाण, अ‍ॅड. हेमाताई पिंपळे, संध्याताई राजपुत, डॉ. खरवडकर मॅडम, डॉ. थोरात मॅडम, अ‍ॅड. शेख शफिक भाऊ,  मोईन मास्टर, अ‍ॅड. सय्यद खाजा, बी.बी.जाधव, संपादक वैभव स्वामी, पत्रकार अमजदखान, शेख वसीम बब्बुलाला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी जिमची पाहणी करून अत्याधुनिक यंत्र साभुग्रीने सज्ज असलेल्या जिमचे कौतुक केले. तसेच यावेळी मिस एशिया इस्टेला गोडे यांनी मार्गदर्शन करून सध्याच्या काळात महिलांसाठी शाररिक फिटनेस किती आवश्यक आहे हे सांगीतले.

जिमचे संचालक डॉ. इलियास खान यांच्यामुळे बीडमध्ये महिला जिमची उभारणी केल्याने महिलांनी याचा पुरेपुर लाभ घ्यावा असे अवाहन मान्यवरांनी केले.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/