खेड-शिवापूर दर्ग्याजवळ झोपलेले पाच जण गेले वाहून, दोघांचे मृतदेह सापडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर येथील दर्ग्याजवळच्या ओढ्याला आलेल्या पुरात पाच जण वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

बुधवारी रात्री पुणे शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे खेड शिवापूर येथील दर्गाजवळून वाहत असलेल्या ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पूर आला. या दर्ग्याजवळील एका शेडमध्ये पाच जण झोपले होते. ओढ्याचे पाणी या शेडमध्ये शिरल्याने झोपलेले हे पाचही जण वाहून गेले असून त्यांच्यातील दोघांचे मृतदेह सापडले आहेत.

इतरांचा शोध घेण्याचे काम सुरु असून या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेकांच्या शेतात पाणी शिरले असून बांध फुटले आहेत.

Visit : policenama.com