PMC Bank Scam : गरज पडल्यास कायद्यात तरतूद : अर्थमंत्री निर्मला सितारमण
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पीएमसी बँकेचा व्यवहार केंद्र सरकारच्या अखत्यारित येत नाही. मात्र आज संध्याकाळी मी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरशी याबाबत चर्चा करणार आहे. या घोटाळ्याचा अभ्यास करून आवश्यक ती पावलं उचलली जातील, असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिले आहे. या मोठ्या घोटाळ्यावर अर्थमंत्री सितारमण पहिल्यांदाच समोर आल्या आहेत.
Maharashtra: Finance Minister Nirmala Sitharaman met the depositors of Punjab and Maharashtra Co-operative (PMC) Bank in Mumbai today. pic.twitter.com/PVekascl5U
— ANI (@ANI) October 10, 2019
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण या मुंबई दौऱ्यावर असून पीएमसी खातेदारांनी त्यांना भाजपच्या कार्यालयात गाठले. यावळे खातेदारांनी आमचे पैसे आम्हाला परत द्या अशी मागणी त्यांच्याकडे केली. सितारमण यांनी खातेदारांची भेट घऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खातेदारांच्या मतदतीसाठी आवश्यक ती पावलं उचलण्याचे आश्वासन खातेदारांना दिले.
गरज पडल्यास कायद्यात तरतूद –
केंद्र सरकारच्या अखत्यारीत त्याचा व्यवहार येत नाही. मात्र तरीही मी माझ्या सचिवांना ग्रामविकास खात्याशी चर्चा करून याची गंभीर दखल घेण्यास सांगितले आहे. गरज पडल्यास कायद्यात तरतूद करुन गैर व्यवहार थांबवता येतील का याबाबत पावलं उचलणार आहोत. तसेच पुढच्या संसदीय अधिवेशनामध्ये याबाबत काही कठोर तरतुदी करुन गैरव्यवहाराला चाप बसवण्याचे काम केले जाईल, असे सितारमण यांनी सांगितले.
Visit : Policenama.com
- ‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब ! आवश्य करून पहा
- ज्येष्ठांनी घ्यावी काळजी, अन्यथा ‘हा’ आजार ठरू शकतो घातक,अशी घ्या काळजी
- उपाशीपोटी खा ‘ही’ ४ फळे, राहाल निरोगी, हृदयासह पचनाचे आजार होतील दूर
- केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात का? मग रोज ‘हे’ आवश्य खा
- घरच्याघरी तयार करा बाम, डोकेदुखीवर आहे रामबाण, अशी आहे पद्धत
- प्रथमच प्रणायाचा आंनद घेताय ? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी
- घसा दुखतोय ? मग करा ‘हे’ खास घरगुती उपाय, ताबडतोब मिळेल आराम
- फॅशन करा पण, आरोग्यावर परिणाम होणार याची काळजी घ्या, ‘हे’ आहेत परिणाम