आईच्या निधनाचे दु:ख विसरून ‘हा’ 16 वर्षाचा क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी सज्ज

इस्लामाबाद ( पाकिस्तान ) वृत्त संस्था – पाकिस्तानी वेगवान गोलंदाज नसीम शाह आईचे निधनाचे दुःख विसरून आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. मागील आठवड्यात त्याच्या आईचे निधन झाले होते. नसीमचे वय केवळ 16 वर्षे आहे, परंतु त्याच्या चेंडूचे वेग आणि अचूक गोलंदाजी या कौशल्याच्या जोरावर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे.

गुरुवारी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना होणार आहे. यात नसीम शाह याला संधी मिळू शकते. डेनिस लिली आणि न्यूझीलंडचा गोलंदाज शेन बॉण्ड यांच्याशी त्याची तुलना केली जाते. जर त्याला या सामन्यात संधी मिळाली तर तो भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरशी बरोबरी करू शकतो. सचिननेही वयाच्या सोळाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

मागील वर्षी सप्टेंबरमध्ये नसीमने लाहोरकडून प्रथम श्रेणीमध्ये प्रवेश केला होता. नसीमने सहा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 16.50 च्या सरासरीने 26 विकेट घेतले आहेत.

Visit :  Policenama.com