‘मी पुन्हा येईन’, शिवतीर्थावर शिवसैनिकांच्या फडणवीस यांच्या विरोधात घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर गेले असता त्यांना शिवसेनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. मी पुन्हा येईन…. मी पुन्हा येईन…. मी पुन्हा येईन…’ , अरे आवाज कुणाचा?

चा अशा घोषणा देत शिवसैनिकांनी शिवतीर्थ दणाणून सोडला.

भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यावेळी भाजपचे नेते विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते. फडणवीस शिवतीर्थावरून बाहेर पडत असताना त्यावेळी परिसरात उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा , मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर फडणवीस तातडीने गाडीत बसून तेथून निघून गेले.

शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही : संजय राऊत
देवेंद्र फडणवीस यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला. स्वाभिमान आणि हिंदुत्वाचा बाणा कधीही सोडू नका, असा संदेश या व्हिडिओत बाळासाहेब देताना दिसत आहेत. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत असे प्रत्युत्तर दिले आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like