एस टी- बोलेरोच्या अपघातात इंदापूरचे माजी सभापती गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एस टी आणि बोलेरो जीप यांच्या झालेल्या अपघातात जीपचा चक्काचूर झाला असून त्यात इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात भिगवण रोडवरील पिंपळे गावाजवळ गुरुवारी सकाळी झाला.

रमेश जाधव हे एकटेच जीपने भिगवण येथून बारामतीच्या दिशेने पिंपळे येथील सावडण्याच्या विधीसाठी जात होते. मदनवाडी येथील एका वळणावर जीप आणि एस टी एकदम एकमेकांसमोर आले. त्यांनी धडक चुकविण्याचा प्रयत्न केला. पण, दोन्ही वाहने एकमेकाच्या बाजूला धडकली. त्यात त्यांच्या बोलेरो जीपचा चक्काचुर झाला. जीपचे टप पूर्णपणे तुटले.

अपघातानंतर गावकऱ्यांनी तातडीने जाधव यांना भिगवण येथील खासगी आय सी युु सेंटरमध्ये हलविले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. जाधव यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात हलविण्यात आले आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी