माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही गंभीर !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. कोविड १९ चे निदान झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. त्यांच्या डोक्याची शस्त्रक्रिया सुद्धा झाली आहे. ते दिल्लीच्या मिलिटरी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत. हॉस्पिटलने त्यांची प्रकृतीची माहिती देताना, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हंटले आहे. वेंटिलेटरवर त्यांचा उपचार सुरू आहे.

प्रणव मुखर्जी यांनी ट्विट करून सांगितले की, त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन होण्याची आणि कोरोना चाचणी करण्याची विनंती केली. मुखर्जी यांना हॉस्पिटल मध्ये भरती करावे लागले तेव्हा शस्त्रक्रिया आधी त्यांना कोविड १९ ची लागण झाल्याचेही स्पष्ट झाले होते.

सोमवारी मुखर्जी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आले. यानंतर त्यांची प्रकृती नाजूक बनली आहे. १० ऑगस्ट रोजी गंभीर स्थितीत १२ वाजून ७ मिनिटांनी त्यांना दिल्लीतल्या मिलिटरी आर ॲण्ड आर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तज्ञ डॉक्टरांची टीम निगरानीखाली उपचार सुरू आहे. माजी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे त्यांची सर्जरी झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 10 ऑगस्ट रोजी त्यांना 12 वाजता गंभीर अवस्थेत दिल्ली छावणीतील सैन्याच्या आर अँड आर रुग्णालयात दाखल केले गेले होते. विविध तज्ञांसह डॉक्टरांची टीम त्यांच्या आरोग्यावर निरंतर नजर ठेवून आहे.