अहमदनगर : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा शनिदरबारी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकातील 15 विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्‍वभूमीवर माजी पंतप्रधान व जनता दलाचे नेते एच. डी. देवेगौडा हे आज शनि शिंगणापुरात दाखल झाले. त्यांनी दर्शन घेऊन अभिषेक घातला.

आज कर्नाटकमध्ये 15 विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटकमध्ये 15 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक 5 डिसेंबरला पार पडली. निकालाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक जनता दल पार्टीचे नेते एचडी देवगौडा यांनी शनिशिंगणापूर देवस्थानला भेट दिली आणि शनीचं दर्शन घेतले. देवेगौडा हे शनिशिंगणापुरात आले त्यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे काही पदाधिकारी व त्यांचे विश्वासू कार्यकर्ते उपस्थित होते.

15 जागांसाठी 165 जण आपलं नशीब आजमावत आहेत. त्यातच 15 पैकी 6 मतदारसंघात भाजपला विजय मिळवणं गरजेचं आहे. तसं न झाल्यास कर्नाटकातील येडीयुरप्पांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकार कोसळू शकते. त्यानंतर येथे पुन्हा काँग्रेस आणि जेडीएस सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात. या पोटनिवडणुकीत 67.91 टक्के मतदान झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर देवेगौडा हे शनिदरबारी आल्याचे बोलले जात आहे.

Visit : Policenama.com