‘सदनिका’, ‘कार्यालय’, TDR न देता ज्येष्ठ महिलेची फसवणूक ; ओमप्रकाश रांका-वास्तुपाल रांका, बिल्डर मेहता यांच्यासह 5 जणांविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील पर्वती परिसरात असलेल्या जमिनीचा मोबदला न देत ज्येष्ठ महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी ओमप्रकाश नागराज रांका, वास्तुपाल ओमप्रकाश रांका यांच्यासह बांधकाम व्यवसायीक रितेश विजयकुमार मेहता, अंकुश विजयकुमार मेहता यांच्या विरुध्द दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जयश्री अजित दरेकर( वय ६४ रा.प्राधिकरण निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. जयश्री यांची पर्वती शिवारातील वडिलोपर्जीत मालमत्तेवर झोपडपट्टी विकास प्राधिकरण योजनेअंतर्गत 2002 मध्ये करण्यात आलेल्या करारपत्रकात नमूद केल्याप्रमाणे जमिनीच्या मालकी हक्‍काच्या मोबदल्यात देऊ करण्यात आलेली सदनिका, कार्यालय आणी टीडीआर देण्याचे नाकारले. बनावट दस्ताव्दारे वेळोवेळी जमिन खरेदी विक्रीचे अधिकार अदान प्रदान करुन फसवणूक फसवणूक केली आहे. त्यांनी बाराशे चौरस फुटाची एक सदनिका डिड हजार चौरस फुटाचे कार्यालय आणी दहा हजार चौरस फुटाचा टीडीआर देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, काहीही न देता रांका आणि बिल्डर मेहता यांनी जयश्री यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक धुमाळ करत आहेत.

शहरातील प्रसिद्ध रांका ज्वेलर्सच्या पिता-पुत्रांसह इतरांवर एका ज्येष्ठ महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

ओमप्रकाश नागराज रांका, वास्तुपाल ओमप्रकाश रांका, बांधकाम व्यवसायीक रितेश विजयकुमार मेहता, अंकुश विजयकुमार मेहता व संजय डी. दापोडीकर यांच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यात भादवी कलम 420, 406, 465, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.