वारंवार लघवीला येण्याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम

वारंवार लघवीला लागणं

जेव्हा तुम्ही वारंवार लघवीला जाता तेव्हा ते संसर्ग किवा मुतखडा अशा रोगांमुळं होऊ शकतं. यामुळं अनेक संबंधित समस्या होऊ शकतात. विशेष म्हणजे यामुळं एखाद्याला त्याच्या दैनंदिन जीवनात अडथळाही निर्माण होऊ शकतो.

काय आहेत याची लक्षणं ?

– लघवीला वारंवार जाण्याची फ्रीक्वेंसी ही रात्री जास्त असू शकते. यामुळं झोपेत अडथळा येतो. याचा परिणाम असा होतो की, दिवसा सुस्ती आणि झोपेची गुंगी राहते.

– वारंवार लघवीला गेल्यानं तहान वाढते.

काही असामान्य लक्षणंही आढळून येतात. ही लक्षणं पुढीलप्रमाणे –

– ताप आणि सर्दी
– पाठदुखी
– पोटदुखी
– मूत्रविसर्जनावेळी अस्वाभाविक स्त्राव
– मळमळ

काय आहेत याची कारणं ?

– खूप द्रवपदार्थ पिणं किंवा अत्यंत थंड स्थिती जाणं असे काही शारीरिक बदल झाल्यास वारंवार लघवीला येऊ शकते.

– डायबिटीस मेलिटस किंवा डायबेटीस इंसिपिड्स असलेले रुग्ण देखील वारंवार लघवीला जातात.

– वारंवार लघवी हे युरीनरी ट्रॅक इंफेक्शन आणि ओव्हरॅक्टीव ब्लॅडर याचं एक लक्षणं आहे.

– महिलांमध्ये असंतुलित मेनोपॉज किंवा अॅस्ट्रोजन यामुळं वारंवार लघवी करण्याची इच्छा होऊ शकते.

– युरीनरी ब्लॅडर स्टोन्स हे वारंवार लघवीला येण्याचं दुसरं कारण आहे.

– कधीकधी अँटीएपिलेप्टीक्स सारखी औषधही यास कारणीभूत असतात.

काय आहेत यावरील उपचार ?

आधी तर डॉक्टर तुमच्या लक्षणांची सुरुवात आणि कालावधी यांचा इतिहास घेतात. याच्या लक्षणं आणि कारणांवर याची उपचारपद्धती अवलंबून असते. काही उपचार पुढीलप्रमाणे –

– जर संसर्गामळं वारंवार लघवीला येत असेल तर यावर अँटीबायोटीक्स उपयुक्त ठरतात.

– डायबेटीस मेलिटस इंसुलिन थेरपी किंवा औषधं आणि काही जीवनशैलीतील बदलांसह ही स्थिती नियंत्रणात आणली जाऊ शकते.

– जर अतिसक्रिय मूत्राशय हे याचं कारण असेल तर स्नायूंना आराम देणारी औषधं दिली जातात.

– मुत्राशय प्रशिक्षण व्यायामांचाही याला फायदा होतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.