रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाचं ! नववर्षात ‘महाग’ होणार ट्रेनचा प्रवास, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन वर्षात रेल्वेने प्रवास करणे महाग होऊ शकते. रेल्वे बोर्डानेही यासाठी तयारी सुरू केली आहे. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी असे संकेत दिले आहेत की रेल्वे बोर्ड सध्याच्या परिस्थितीनुसार प्रवासी आणि मालवाहतुकीचे भाडे तर्कसंगत करणार आहे.

याचा अर्थ असा की जिथे भाडे कमी असेल तेथे वाढ केली जाईल आणि जेथे भाडे जास्त असेल तेथे कमी केले जाईल. प्रदीर्घकाळ प्रवासी भाड्यात वाढ झालेली नाही, त्यामुळे जिथे भाडे कमी असेल तेथेही वाढ होऊ शकते असेही ते म्हणाले. त्याचबरोबर मालवाहतूक रस्ते क्षेत्राच्या प्रमाणात निश्चित करण्यात येईल.

अलीकडेच मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रेल्वे उच्च मागणी असलेल्या मार्गावरील प्रवासी भाडे वाढवणार आहे. आता रेल्वे मंडळाचे अध्यक्षही अशीच काही चिन्हे देत आहेत. उद्योग वाढीची कल्पना अशा वेळी समोर आली आहे जेव्हा रेल्वेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याचे कॅगने नुकतेच म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/