जुगार अड्ड्यावर छापा, नऊजणांवर कारवाई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुदळवाडी, चिखली येथील मोकळ्या मैदानात खुलेआम सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवारी रात्री पावणे आकाराच्या सुमारास छापा टाकला. यावेळी नऊ जणांवर कारवाई करुन आठ हजार ८०० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

भानुदास रामदास यादव (४५, रा. रामदासनगर, चिखली), श्रीराम उद्धव नालेगावकर (३६, रा. केशवनगर, चिखली), दत्तात्रय गुलाब हजारे (४२, रा. राजगुरूनगर), न्यानेश्वर सुरेश नवले (२५, रा.नेवाळेवस्ती, चिखली), दीपक राजेंद्र सपके (३२, रा. पूर्णांनगर, चिंचवड), भागवत त्रिंबक साबळे (३३, रा. रामदासनगर, चिखली), अनवर हानिफ शेख (४८, रा. मोशी), मसूदअली मकबूल शेख (४८, रा. कुदळवाडी, चिखली) आणि संतोष कांताराम तळेकर (४२, रा. जाधववाडी, चिखली) यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. पोलीस कर्मचारी नरहरी नाणेकर यांनी फिर्याद दिली आहे.

[amazon_link asins=’B079GTSCKY,B07437YHXP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’886d273e-b3fe-11e8-823e-8fb85b2d2230′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली, कुदळवाडी येथील नोबेल वजन काट्याजवळील मोकळ्या मैदानात खुलेआम तीन पानी जुगार अड्डा सुरु होता. शहरात अनेक अवैद्य धंद्यावर कारवाई सत्र सुरू आहे. त्यामुळे निगडी पोलिसांनीही या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्याचे धाडस केले. यावेळी या ठिकाणी खेळत असणाऱ्या नऊ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे.