Ganesh Festival Toll Free Pass | गणेशभक्तांसाठी खुशखबर! टोलमाफीचा GR निघाला, जाणून घ्या कालावधी आणि पास कसा काढायचा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ganesh Festival Toll Free Pass | गणपती उत्सवासाठी हजारो चाकरमानी गणेशभक्त दोन-चार दिवस आधीच मुंबईहून कोकणात जातात. कोकणात जाणाऱ्या या गणेशभक्तांसाठी एक खुशखबर आहे. राज्य सरकारने चार दिवस आधीपासून कोकणाकडे जाणाèया वाहनांना टोलमाफी जाहीर केली आहे. तसा जीआर काढण्यात आला आहे. (Ganesh Festival Toll Free Pass)
१६ स्पटेंबर २०२३ ते दि.०१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत कार, बस आदी वाहनांना टोल माफी दिली जाणार आहे. गणेशोस्तव २०२३, कोकण दर्शन असे स्टीकर्स गाड्यांवर चिकटविले जातील. मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावरून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना या टोलमाफीचा लाभ मिळेल. (Ganesh Festival Toll Free Pass)
कुठे मिळणार पास?
गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्यासाठी पास दिला जाईल. हा पास परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ) यांच्याशी समन्वय साधून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. ऑफिसेसमध्ये उपलब्ध केला जाणार आहे.
हे पास परतीच्या प्रवासासाठी ग्राह्य असतील. या पासवर चालकाचे नाव, गाडी क्रमांक, जाण्या- येण्याची तारीख आदी माहिती असेल.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
ACB Trap Case | PhonePe वर लाच घेणाऱ्या विशेष वसुली व विक्री अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक
ऑनलाइन टास्क देत तरुणाची 31 लाख 30 हजारांची फसवणूक, हडपसरमधील प्रकार
पत्नीला मारहण करणाऱ्या पतीला न्यायालयाचा दणका, घरात प्रवेश बंदी