गणेशोत्सव 2020 : ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर मनपाकडून पदपथांवर तसेच डेंगळे पुलावर स्टॉल उभारण्यास मनाई, ‘या’ ठिकाणी असणार 591 स्टॉल्स

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेने यंदा रस्त्याच्याकडेला पदपथांवर तसेच डेंगळे पुल येथे गणेश मुर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यास मनाई केली आहे. त्याऐवजी शहरातील १५ क्षेत्रिय कार्यालयांच्या हद्दीमध्ये ४१ ठिकाणी ऍमेनिटी स्पेस आणि मोकळ्या मैदानांमध्ये साधारण ५९१ स्टॉल्सला परवानगी देण्यात आली आहे. तसेच डेंगळे पुल किंवा शनिवार वाड्याच्या प्रांगणात वर्षानुवर्षे मुर्ती विक्री करणार्‍या विक्रेत्यांना यंदा स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा मंच येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत या स्टॉल्सचे २० ऑगस्ट रोजी उदघाटन होणार आहे. या सर्व विक्रेत्यांना महापालिकेच्यावतीने परवानगी देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.विक्रेत्यांकडून १० हजार रुपये डिपॉझीट आणि दरदिवसाला ९०० रुपये भाडे आकारणी करण्यात येणार असून सङ्गाई शुल्कापोटी एक हजार रुपये आकारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती सभागृहनेते धीरज घाटे यांनी दिली आहे.

लोहगाव येथील फिनिक्स मॉल शेजारील क्षेत्रिय कार्यालयाचे आवार, खराडी स.नं.१२ येथील मैदान आणि स.नं. ५ येथील ओटा मार्केट, वडगाव शेरी येथील ओटा मार्केट, धानोरी येथील स.नं.१६३ येथील ऍमेनिटी स्पेस, कळस येथील नवीन मंडई, धानोरी जुना जकात नाका, मंगळवार पेठेतील बाबूराव सणस शाळा, बंडगार्डन पार्किंग, बाणेर स.नं.८७ मधील मंडई, बालेवाडी स.नं. १७ येथील प्ले ग्राउंड, जुना जकात नाका, पाषाण स.नं.१२१, शिवाजीनगर गावठाण येथील शिवाजी व्यायाम शाळा, गोखलेनगरमधील शहिद तुकाराम ओंबाळे मैदान, घोले रस्त्यावरील पंडीत नेहरू सांस्कृतिक भवन, कोथरूड येथील ओटा मार्केट, बावधनमधील स्वामी विवेकानंद शाळा, कोथरूड येथील सावरकर मैदान, लक्ष्मीनगर येथील सह्याद्री मैदान, कात्रज येथील थोरवे प्राथमिक शाळा, धायरी येथील यशवंत विहार सोसायटी ऍमेनिटी स्पेस, वडगाव येथील ओटा मार्केट, वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय आवार, एरंडवणा, कर्वेनगर डी.पी. रोड, शारदा महिला प्रक्षिण केंद्र, सम्राट अशोक विद्यालय, हडपसर भोसले नगर आणि वंडर लँड शाळे लगतची जागा, मोहन धारिया उद्यानासमोरील मैदान, कोंढवा येथील ङ्गायर स्टेशनचे आरक्षण, बिबवेवाडीतील यशवंतराव चव्हाण शाळेचे आवार, बिबवेवाडी पोलिस स्टेशनमागील शाळा, याठिकाणी स्टॉल्सला परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांनी संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी सहकार्य करावे असे आवाहन घाटे यांनी केले आहे.