Girish Mahajan On Uddhav Thackeray | “सामना फक्त आता पुसायच्या कामाचा राहिला आणि मुख्यमंत्री असताना तुम्ही काय दिवे लावले?”; भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Girish Mahajan On Uddhav Thackeray | मराठा आरक्षणाचे राज्यभर पडसाद पडलेले दिसत असताना सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगावमध्ये नुकतीच सभा झाली. या सभेमध्ये त्यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपावर सडकून टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “राम मंदिरसाठी देशभरातून माणसे बोलवतील आणि परत जाताना गोध्रा घडवतील. जाळपोळ करतील, त्यावर आपली पोळी भाजतील. निवडणूक (Elections) आल्यावर घरांच्या होळ्या पेटतील आणि त्यांच्या ते पोळ्या भाजतील” असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला होता. यावर आता भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांचे बोलणे अतिशय बालिश असून यांच्यावर सगळे लोक हसायला लागले आहेत. अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. (Girish Mahajan On Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर उत्तर देत मंत्री गिरीश महाजन यांनी खरपूस समाचार घेतला आहे. गिरीश महाजन म्हणाले की, “उद्धव ठाकरे अतिशय बालिश स्टेटमेंट करत आहे. त्यांच्या मनात काही काळबेरं नाही ना? त्यांना तर असं काही करायचं नाही ना अशी शंका यायला लागली असून संजय राऊत हे लोकांना उचकवायला लागले आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यांनाच काही घडून तर आणायचं नाही ना? यांची चौकशी झाली पाहिजे, पोलिसांनी यांनाच ताब्यात घेतलं पाहिजे, असेही महाजन म्हणाले. (Girish Mahajan On Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील निशाणावर धरले होते. यावरुन भाजपाचे नेते गिरीश महाजन म्हणाले की, “देवेंद्र फडणवीसांवर ते शेलक्या भाषेत आणि खालच्या भाषेत बोलायला लागलेत. त्यांच्याकडे फक्त दोन-चार लोक राहिले आहेत, तो विषय वेगळा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल उद्धव ठाकरे बोलत होते, तेव्हा त्यांची मला कीव येत होती. फस्ट्रेशन आल्याने ते असे बोलत आहेत, त्यांच्या मागे कोणी राहिलेलं नाही, म्हणून ते अस्वस्थ असून आम्हाला त्यांचे शारीरिक व्यंग काढायचे नाही. पंतप्रधान यांच्यावर त्यांनी काय बोलावं? त्यांचेच पंतप्रधान होण्याबाबत बॅनर लागले. विरोधी पक्षात आहेत, म्हणून त्यांना बोलावं लागतं, पण त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवेल का? विश्वासार्हता असायला पाहिजे? शिवाय मुख्यमंत्री असताना तुम्ही काय दिवे लावले? असा सवाल महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर उपस्थित केला.

पुढे गिरीश महाजन यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
महाजन म्हणाले की, “25 वर्षे यांनी काय, कमळाबाईची पालखी वाहिली का?
तुमची स्वतःची पालखी वाहण्यासाठी तुम्हाला चार भोये सुद्धा मिळत नाही. 90 टक्के शिवसेना आमच्यासोबत आहे,
त्यामुळे ते काय बोलत आहेत, काही कळत नाही. कालच्या भाषेवरून मला वाटलं,
त्यांची मनस्थिती चांगली नाही. आमच्याकडे बोलण्यासाठी दहा गोष्टी आम्ही बोलू शकतो.
शारीरिक व्यंगावर, हा असा दिसतो, तो तसा दिसतो, आम्हीही बोलू शकतो.
पण मर्यादा सोडत नसल्याचे महाजन म्हणाले. तसेच सामना पेपर हा फक्त आता पुसायच्या कामाचा राहिला आहे, त्याला महत्त्व देऊ नका. 48 पैकी एक खासदार निवडून आणून दाखवा. संजय राऊत यांनी सुरक्षित मतदारसंघ शोधून निवडून येऊन दाखवावे, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी थेटपणे केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Atul Bhatkhalkar | भातखळकर यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले – ’40 आमदार मराठीत काय बोलत होते…’

Manoj Jarange On Prithviraj Chavan | पश्चिम महाराष्ट्राने काय घोडं मारलं आहे? पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा संताप; म्हणाले – “निजाम घेऊन जायचा…”

Girish Mahajan | भाजप नेते गिरीश महाजनांचे मराठा आरक्षणाबाबत मोठं सुचक वक्तव्य; म्हणाले, “असे आऱक्षण…”