मुलीचं ‘पोत्यात’ घालून ‘अपहरण’ झाल्याच्या फोननं पोलिसांची उघडविली ‘झोप’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – मुंबईमध्ये असताना कोणीतरी माझ्या नाकाला रुमाल लावून मला बेशुद्ध केले आहे. टेम्पोतून माझे पोत्यात घालून अपहरण केले. आई मला वाचव अशी विनवणी करणारा मेसेज आईला मिळाला. तिने मुंबई पोलिसांना ही माहिती दिली. अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचे समजताच पोलीस यंत्रणाना खडबडून जागी झाली. तिच्या मोबाईलचे लोकेशन शोधण्यात आले. तेव्हा ते साताऱ्याच्या जवळ असल्याचे दिसले. पाठोपाठ एका पोलीस पथकाने साताऱ्याकडे कुच केली. सातारा पोलिसांनाही अलर्ट देऊन शोध घेण्यास सांगितले. काही वेळानंतर ही मुलगी चक्क शिवशाही बसमधून उतरताना पोलिसांना दिसली. अन हा मुलीचाच बनाव असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

तरुणींवरील अत्याचाराच्या घटनांनी देश हदरुन गेला आहे. त्यामुळे असा काही प्रकार असल्याचे कुणकुण लागली तरी पोलीस सध्या त्याकडे अधिक गाभीर्याने पाहू लागले आहेत. चेंबूर परिसरात राहणाऱ्या गोवंडी येथील एका १६ वर्षाच्या मुलीने बुधवारी रात्री तिच्या आईला फोन करुन आपले अपहरण झाले असून माझ्या डोळ्यावर रुमाल बांधला आहे. टेम्पोतून मला कोठेतरी घेऊन जात असल्याचे तिने सांगितले. आईने गोवंडी पोलिसांना याची माहिती दिली. अल्पवयीन मुलीचे अपहरण म्हटल्यावर पोलीस उपायुक्तांपासून सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागली. मुलीच्या मोबाईलचे लोकेशन शोधल्यावर ते पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले.

चेंबूर पोलिसांच्या गाड्या तातडीने मुंबईतून पुण्याच्या दिशेने निघाल्या. इकडे सातारा पोलिसांनीही अलर्ट देण्यात आला. सातारा पोलिसांनी नाकाबंदी करुन महामार्गावरील सर्व टेम्पोची तपासणी सुरु केली. या मुलीच्या मोबाईलचे लोकेशन मध्यरात्री दीड वाजता सातारा बसस्थानक दाखवत होते. सातारा पोलिसांनी तातडीने बसस्थानक गाठले. मिळालेल्या फोटोनुसार ते मुलीचा शोध घेत असताना ही मुली शिवशाही बसमधून उतरत आल्याचे आढळून आले. त्या पोलिसांनी चेंबूर पोलिसांना मुलगी सापडल्याचे सांगितले.
तिने हा खोटा बनाव का केला याची चौकशी केल्यावर पोलीसही अवाक झाले. तिचे वडिल मुंबईत रिक्षा चालवितात. त्यांनी दोन लग्न केली आहेत.

त्यांची पहिली पत्नी हैदराबाद येथे तिच्या तीन मुलांसह राहतात. तिच्या दोन मुली व एक मुलगा चांगले शिकून नोकरीला लागले आहेत. ही तिची आई व मोठ्या बहिणीसह गोवंडीला राहते. तिची मोठी बहिण उच्च शिक्षण घेत आहे. पण या मुलीने दहावीतून शाळा सोडून दिली आहे. त्यामुळे तिची मोठी बहिण आणि आई सतत शाळा शिकण्यासाठी बोलत असतात. त्यामुळे तिने घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने अपहरणाची कहाणी बनविल्याचे सांगितले. तिच्या या बनावामुळे मुंबई, सातारा पोलिसांची मात्र मोठी तारांबळ उडाली. चंबूर येथून आलेल्या पोलिसांच्या पथकाने या मुलीला पहाटे ताब्यात घेतले. आणि त्यानंतर साताऱ्याहून मुंबईला रवाना झाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/