अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थिनीची आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन 

एमएससीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने अभ्यासाच्या तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार वाल्हेकरवाडी येथे मंगळवारी दुपारी दिडच्या सुमारास घडला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’18a98ff5-c657-11e8-aca8-6d2f4dab5a6a’]
स्वप्ना महादेव पवार (१७, रा. १०३, साई प्रसाद बिल्डींग, वाल्हेकरवाडी) हिने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्ना ही प्राधिकरणातील तेलंग विद्यालयात एमएससीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. तिला अभ्यासाचा तणाव होता. स्वप्ना ही यंदा गावाकडून पुण्यात शिक्षणासाठी आली होती. ती तिच्या चुलत्यांकडे वाल्हेकरवाडी येथे राहत होती. मंगळवारी दुपारी ती तिच्या मैत्रीनिकडून घरी आली. त्यानंतर ती तिच्या खोलीत गेली.  तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

[amazon_link asins=’B016EOZ7OO,B07BCGC13F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’69ac3da1-c657-11e8-b32e-791d65caab93′]

बराच वेळ आतून काहीच आवाज, हालचाल लक्षात न आल्याने घरातील लोकांनी दरवाजा वाजवला. आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आणि संशय आल्याने शेजाऱ्यांना बोलावले. पोलिसांनाही माहिती दिली. तत्काळ चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी खोलीत जाऊन पाहणी केली. पोलिसांना तिथे चिट्ठी आढळून आली आहे. यामध्ये मी अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या करत आहेत, यास कोणालाही जबाबदार धरू नये. तसेच पोलिसांनी पोलिसांनी कोणाला त्रास देऊ नये असे त्यात म्हटले आहे. तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

जाहिरात