‘पुजा’ बनली ‘जोया’ अन् केला आफताब सोबत ‘निकाह’, नंतर आत्महत्या… लव्ह जिहाद का आणखी काय !

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   वाराणसीची पूजा पाच वर्षांपूर्वी लखनऊच्या मोहम्मद आफताबच्या प्रेमात पडली होती. काही दिवसांच्या प्रेमानंतर दोघांचे लग्न झाले. आफताबसोबत लग्नानंतर वाराणसीची पूजा आता जोया बनली आहे. पूजावरून जोया बनलेल्या या युवतीने शनिवारी आत्महत्या केली. या घटनेनंतर स्थानिक लोक याला लव्ह जिहादशीही जोडून पाहत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भेलूपूर पोलिस स्टेशन परिसरातील बड़ी गैवी भागात राहणारी पूजा पती आफताबसोबत भांडण आणि मारामारी झाली होती. पूजाची आई किरण म्हणाली की, लग्नानंतर नवरा-बायकोमध्ये खूप प्रेम होते पण आफताबची आई वाराणसीहून लखनऊला आल्यानंतर भांडण आणि मारामारी सुरु झाली. पूजाच्या आईने सांगितले की, आफताबचे गेल्या तीन वर्षांपासून दुसर्‍या मुलीशी प्रेमसंबंध सुरु होते, ज्यामुळे पूजा त्रस्त होती.

जोया नावाने हाक मारायचा आफताब

दुसरीकडे स्थानिक लोक त्याला लव्ह जिहादचे प्रकरण म्हणत आहेत. माहितीनुसार पूजा आणि आफताब यांच्यातील भांडणे नमाजवरून असल्याचे समजते. आफताब पूजाला नमाज पठाण करण्याचा आग्रह करायचा, परंतु पूजा यासाठी तयार नव्हती. शेजारी राहणाऱ्या सुनील कुमार वर्मा या युवकाने सांगितले कि, “आफताब तिला कधीही पूजा या नावाने हाक मारत नसे, तो तिला जोया या नावाने बोलवायचा.

दरम्यान, कार्यक्षेत्र अधिकारी भेलूपूर यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी या दोघांचा प्रेम विवाह झाला होता. त्यानंतर पूजा किंवा तिच्या कुटुंबीयांच्या वतीने पोलिस ठाण्यात कधीही तक्रार करण्यात आलेली नाही. सुरुवातीच्या टप्प्यात हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसते. पूजाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल आणि इतर बाबींचा तपास केला जाईल.