लग्न न करता 6 महिने पत्नी बनवुन ‘ठेवलं’ तिला, नंतर झालं ‘असं’ ज्याचा तिनं स्वप्नात देखील ‘विचार’ केला नसेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लग्नाचे अमिश दाखवून आरोपीने युतीवर वारंवार बलात्कार केला एवढेच नाही तर फरिदाबादमध्ये सहा महिने आरोपीने तरुणीला पत्नी म्हणून ठेवले यावेळी एकदा तरुणीचा गर्भपात सुद्धा केला. महिलेने आरोपी विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आता पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

पीडित महिला आपल्या आई वडिलांसोबत राहत होती, 10 सप्टेंबर 2017 रोजी युवतीच्या कुटुंबामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये शहरातील बालाजी पुरम येथील रहिवासी सुमंत सक्सेना उर्फ बबलू देखील आला होता. त्यानंतर बबलूचे घरी येणे जाणे वाढले. लग्नाचे अमिश दाखवून बबलूने तरुणीशी संबंध बनवले. नातेवाईकांना याबाबत माहिती असल्यामुळे त्यांनी या दोघांचे लग्न लावून दिले.

यानंतर आरोपीने तरुणीसोबत घटस्फोट घेतला आणि तीला फरिदाबाद येथे घेऊन गेला. त्याठिकाणी एक भाड्याचे घर घेऊन सहा महिन्यांपर्यंत तिच्या सोबत राहिला. तसेच यावेळी त्याने एकदा तरुणीचा गर्भपात देखील केला.

14 नोव्हेंबर 2019 रोजी आरोपीने युवतीला एका बस स्टॅण्डवर सोडून दिले. युवतीने एसपी अजय शंकर राय यांच्याकडे तक्रार दाखल करत सांगितले की, माझे आयुष्य बरबाद केल्यानंतर आता आरोपी दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करत आहे. सोमवारी रात्री पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत आरोपीला शोधमोहीम सुरु केली आहे.

यामुळे झाला घटस्फोट
प्रकार दुसऱ्या समुदायातील असल्यामुळे ज्यावेळी नातेवाईकांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी या दोघांचे लग्न लावून दिले होते. परंतु आरोपीने तरी देखील ऐकले नाही. युवतीला आरोपीने घटस्फोट दिला होता त्यानंतर देखील त्याने तरुणीला आपल्या जाळ्यात अडकवून ठेवले होते.

Visit : Policenama.com