व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पोलिसाकडून युवतीवर वारंवार बलात्कार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   नागपूर शहर पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख झालेल्या युवतीवर कारमध्ये बलात्कार केला. रिझवान उस्मान शेख (वय २८, राहणार पीसी क्वाॅर्टर, पोलिस लाइन टाकळी, नागपूर ) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. युवतीला याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिचं वारंवार शोषण केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय तरुण उच्चशिक्षित आहे. रिझवानने मैत्रिणीकडून तिचा मोबाईल नंबर घेतला. नंबर मिळताच रिझवान चॅटिंग करायला लागला. २०१४ मध्ये त्यानं तिला वर्धा रोडवर भेटायला बोलवलं. फिरून येऊ कशी थाप मारली. थेट जंगलात नेऊन कार थांबवली तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर रिझवानने फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत शोषण केलं. हे फोटो तुझ्या आई-वडिलांना टपालाने पाठवली अशी धमकी सातत्याने रिझवान देत होता. यामुळं ती जाळ्यात अडकली. त्यामुळे आई-वडिलांना खोटे सांगून ती रिजवान सोबत पुणे जबलपूर आणि अन्य ठिकाणी गेली ते त्याने तिच्यावर अत्याचार केला तो वारंवार फोटो काढत होता या प्रकाराला ती कंटाळली.

फोटो व्हायरल करण्याच्या धमकीला ती घाबरत नसल्याचे बघून रिझवानने लग्नाचे आमिष दाखवलं. सहा महिन्यात लग्न करू असा विश्वास दाखवला. मात्र, नात्यातील एका युवतीशी गुपचूप साखरपुडा उरकण्याचा प्रयत्न त्यानं केला. ही माहिती मिळताच युवतीने लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी लग्नाला नकार देत पेन ड्राइव्हमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडितेची कारही रिझवानने धमकी देऊन हडपली. गावी जाऊन परत येतो असं सांगून तिची कार वापरायला लागला. पोलिस क्वाॅर्टर गाठवून कार परत मागितली. तेव्हा त्याने दारू पिऊन तिला जबर मारहाण केली. तसेच कार परत करण्यास नकारही दिला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तिनं गिट्टीखदान पोलिसात तक्रार केली.

You might also like