कोणाची आहेत दीड कोटींची ही सोन्याची बिस्किटे ? ट्रेनमध्ये सापडली मात्र घ्यायला अद्याप कोणीही नाही आलं

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   लोक अनेकदा ट्रेनमध्ये सामान विसरतात. परंतू असे कधी ऐकले नसेल कि, कोणी गोल्ड बार म्हणजेच सोन्याची बिस्किटे ट्रेनमध्ये विसरले. अशीच एक घटना स्वित्झर्लंडमधील उत्तरेकडील शहर सेंट गॅलन येथे घडली आहे. तेथील रेल्वेमध्ये प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना 191,000 म्हणजेच दीड कोटी रुपयांची सोन्याचे बिस्किटे मिळाली आहेत. दरम्यान, ही घटना गेल्या वर्षी ऑक्टोबरची आहे पण सीएनएनने नुकतीच ती नोंदवली आहे. कोणीतरी आपले दीड कोटी सोन्याचे बिस्किटे ट्रेनमध्ये विसरले. स्वित्झर्लंडच्या ल्यूसर्न शहरातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑक्टोबरपासून इतके दिवस उलटून गेले आहेत, परंतु इतक्या कोटींची किमतीची सोन्याची बिस्किटे घेण्यासाठी कोणीही आले नाही.

यानंतर ल्यूसर्न शहराच्या प्रशासनाने जाहीर केले की, हे सोने कोणाचे आहे त्यांनी येऊन घेऊन जावे. त्या व्यक्तीकडे केवळ पाच वर्षांसाठी हे सोने परत घेण्याची संधी आहे. यानंतर, त्या व्यक्तीची सोन्यावरील मालकी संपेल. ल्यूसर्न शहराच्या प्रवक्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पोलिस आणि प्रशासनाजवळ काही लोकांनी चौकशी केली आहे. मात्र, अद्याप कोणीही ते घेण्यास आले नाही. म्हणूनच आम्हाला शंका आहे कि, हे सोने बेकायदेशीर अथवा स्मगलिंगचे देखील असू शकते.

अडचण अशी आहे की ऑक्टोबरपासून आतापर्यंत एकूण 9 महिने झाले आहेत, परंतु सुमारे 1.45 कोटी किंमतीचे सोन्याची बिस्किटे घेण्यास कोणीही आले नाही. यापूर्वीही अशी घटना घडली आहे. 2017 मध्ये 500 युरोच्या नोटांने बर्‍याच रेस्टॉरंट्सचे टॉयलेट जाम केले होते. हे काम कोणी केले आहे, आजपर्यंत कोणालाही ठाऊक नाही.