ऐन लग्नसराईत सोनं-चांदी ‘महागलं’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यांच्या किंमती वाढल्याचा परिणाम मंगळवारी स्थानिक सराफ बाजारात दिसून आला. दिल्लीत सोन्याच्या किंमती 328 रुपयांनी वाढल्या. तर चांदी देखील चकाकली. चांदी थोडी थोडकी नाही तर 748 रुपयांनी महागली. परंतू तज्ज्ञांच्या मते पुढे सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिका आणि चीन व्यापार करारावर जवळपास सहमती झाली आहे.

सोन्याच्या किंमती –
मंगळवारी सोने सराफ बाजारात 38,700 रुपयांवरुन 39,028 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. सोमवारी सराफ बाजारात सोन्याच्या किंमती 38,860 रुपयांनी घसरुन 38,775 रुपये झाल्या होत्या.

चांदीच्या किंमती –
मंगळवारी दिल्लीत 1 किलोग्रॅम चांदी 45,125 रुपयांनी वाढून 45,873 रुपये झाले.

का महागले सोने –
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात अचानक तेजी आली आहे. सोने 1470 डॉलर प्रति औंसवर पोहचले तर चांदीचे दर 17.10 डॉलर प्रति औंसवर पोहचले.

1 जानेवारी 2020 पासून बदलले सोन्याचे दागिणे खरेदीचे नियम –
देशात 1 जानेवारीपासून सोने खरेदी करण्याचा नियम बदलणार आहेत. मोठ्या कालावधीनंतर कंज्युमर अफेयर्स मंत्रालयाने सोने चांदीच्या दागिण्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य असण्याला हिरवा कंदील दाखवला आहे. हॉलमार्किंगचे अनिवार्य असणे 1 जानेवारीपासून लागू होईल.

1. मंत्रालय लवकरच यासंबंधित नोटिफिकेशन जारी करु शकते. जे भाग दूर अंतरावर आहे त्यांना अनिवार्य हॉलमार्किंग लागू करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी देण्यात येईल

2. सरकारच्या या निर्णयाचा सराफ बाजारावर मोठा परिणाम होऊ शकतो. परंतू ग्राहकांना याचे फायदे तर नक्कीच होतील. सध्या फक्त 40 टक्के दागिण्यावर हॉलमार्किंग करण्यात येते.

3. भारत सोन्याचा सर्वाधिक मोठा आयातदार देश आहे, जो मोठ्या प्रमाणात दागिणे उद्योगाच्या मागणीला पूर्ण करतो. भारत दरवर्षी 700 – 800 टन सोने आयात करतो.

Visit : Policenama.com