औद्योगिक क्षेञातील अत्यावशक सेवा देणारे उद्योग सुरु झाल्याने कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार

मुरबाड  : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोनाच्या महामारीत गेल्या महीना दिड महीन्यापासून बंद असलेले मुरबाड औद्योगिक क्षेञातील अत्यावश्यक सेवांची निर्मीती करणारे काही उद्योग शासनाच्या अटी शर्तीच्या अधीन सुरु करण्यात आले असल्याने ,या उद्योगांचा बिघडत चाललेला आर्थिक डोलारा सावरण्यास यामुळे मदत तर होणारच परंतू कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार आहे .

आगोदरच आर्थिक मंदीचा सामना करीत असलेला उद्योग क्षेञ , कोरोनाच्या महामारीत दीड दोन महीने बंद ठेवण्याचे आदेश शासनाने देऊन कामगारांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मालकांनी त्यांच्या वेतनाची व्यवस्था करण्याचे निर्बंध घातले . मार्च महीन्याचा पूर्ण पगार दिला गेला . परंतू एप्रील महीन्याचा पगार देतांना मालकांच्या नाकीनऊ आले . परंतू एप्रीलचे वेतन दिले नाही तर शासनाच्या कारवाईची भिती . त्यातच शासनाने अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग व्यवसाय सुरु करण्यास अटीशर्ती लाऊन मान्यता दिली . याचा फायदा घेत मुरबाड औद्योगिक क्षेञातील महाराष्ट्र टयुब , पारले , चाॅकलेट उत्पादन करणारी कंपनी तसेच ट्रॅक्टरचे पार्ट तयार करणारी कंपनी सह इतर उद्योग सुरु करण्यात आले आहेत . यासाठी स्थानिक कामगार , सोशलडिस्टनस , कंपनी बाहेर सॅनिटायझर सिस्टेम , पन्नास टक्के कामगार मर्यादा सर्व कामगारांना पासेस देण्यात आले आहेत .काही अंशी का होईना परंतू मुरबाड औद्योगिक क्षेञातील कारखाने सुरु झाल्याने कामगारा सोबतच मालकांना दिलासा मिळाला . परंतु दुसरी अडचण कच्च्या मालाची राहणार असून शासनाने त्याचा पुरवठा कायम ठेवला तर उद्योग निर्वीध्न सुरु राहतील . असे मुरबाड मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे उपाध्यक्ष नरेश शेठ यांनी सांगीतले .