‘महाशिवआघाडी’कडून मुस्लिमांसाठी ‘ते’ आरक्षण लागू होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुस्लिम बांधवासाठी लागू केले 5 टक्के आरक्षण युतीच्या काळात लागू करण्यापासून रोखण्यात आले होते परंतू आता मुस्लिम बांधवांसाठी आनंदाची बाब आहे की हे आरक्षण पुन्हा लागू करावे यासाठी राज्यात सत्तास्थापन करु पाहणारी महाशिवआघाडी प्रयत्न करणार आहे. या प्रकरणी महाशिवआघाडी सकारात्मक आहे. यासाठी शिवसेनेला देखील तयार असल्याची माहिती आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राज्यात 2014 साली मुस्लिम बांधवांसाठी 5 टक्के आरक्षण देऊ केले होते. परंतू युती सरकार आल्यानंतर हा विषय मागे पडला आणि आरक्षण कायम राहू शकले नाही. आता युती सरकार नाही तर महाशिवआघाडी सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चाला आला आहे.

शिवसेनेचे भाजपशी बिनसल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी, काँग्रेसशी मिळतं जुळतं घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एका समान किमान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. याच मसुद्यात मुस्लिम बांधवाच्या 5 टक्के आरक्षणाचा मुद्दा आहे. हाच मसुदा आता तिन्ही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात आला आहे. याच मसुद्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसमोर मुस्लिम बांधवांना आरक्षण देण्याची अट ठेवली होती. ही अट शिवसेनेने मान्य केली असून शिवसेना त्याला तयार आहे.

Visit : Policenama.com