दुचाकी घेणाऱ्यांसाठी खुशखबर ! सणासुदीच्या काळात वाहनांच्या किंमती घटणार, अर्थमंत्र्यांनी दिले संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नवीन दुचाकी स्वस्त होऊ शकतात असे संकेत दिले आहेत. फेस्टिव्ह सीजन मध्ये दुचाकी स्वस्त होऊ शकतात,असे सीतारमण यांनी मंगळवारी सांगितले. त्या म्हणाल्या की, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स (जीएसटी) कौन्सिल दुचाकी वाहनांवर टॅक्स कमी करण्याचा प्रस्तावार अॅक्शन घेणार आहे. कारण हे लक्जरी वा डिमेरिट गूड नाही. सध्या दुचाकी वाहनांवर 28 टक्के जीएसटी लावले जात आहे.

19 सप्टेंबर रोजी होणाऱ्या कौन्सिल बैठकीतून पहिल्यांदाच याबाबत माहिती समोर आली आहे. सणांच्या काळापूर्वी दुचाकी वाहनांमध्ये टॅक्स कमी करण्याची मागणी वाढू शकते आणि अशावेळी जेव्हा कोरोना व्हायरसचा कहर असल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने खासगी विक्रीवर परिणाम झाला असून यामध्ये मंदी आली आहे.

सरकारला कौन्सिलच्या बैठकीदरम्यान टॅक्समध्ये घट करण्यासाठी राज्यांकडून सहमती घेण्यासाठी काही राजस्व नुकसानीचेही आकलन करावे लागणार आहे. CII सोबत एकत्रितपणे झालेल्या या बैठकीत सीतारमण यांनी सांगितले की, सरकारने हॉस्पिटॅलिटी सेक्टर वरील ताण कमी करण्यासाठी हॉटेल, बॅक्वेट्स आणि संबंधित हालचालींसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीड्यूरवर लक्ष द्यावे लागेल.