मोदी सरकारनं ग्राहकांच्या तक्रारीसाठी बनवलेलं अ‍ॅप लॉन्च, 60 दिवसाच्या आत सुनावणी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नरेंद्र मोदी सरकारने ग्राहकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी एक नवीन अ‍ॅप सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या साठी एका कंज्यूमर अ‍ॅप चे लॉन्चिंग देखील करण्यात आले. याच्या माध्यमातून ग्राहक कोणत्याही सेवेबाबत तक्रार करू शकतात. ज्याची सुनावणी साठ दिवसांमध्ये करण्यात येईल.

याशिवाय सरकारने सांगितले आहे की, ग्राहकांच्या किरकोळ तक्रारींवर पंधरा दिवसांमध्ये निवाडा केला जाईल. या अ‍ॅपमध्ये इंग्रजी आणि हिंदी अशा दोनीही भाषा असणार आहे. गुगल आणि अ‍ॅप स्टोअरवरून हे अ‍ॅप फ्री मध्ये डाउनलोड करता येणार आहे.

केंदीय मंत्री रामविलास पासवान यांनी अ‍ॅपच्या लॉन्चिंग वेळी सांगितले की, ग्राहक याद्वारे थेट दाद मागू शकतात आणि तक्रारींवर काय कारवाई केली गेली हे सुद्धा ग्राहकांना यावर पाहता येणार आहे. तसेच आम्ही मिळालेल्या तक्रारींवर लवकरात लवकर निवाडा करण्याचा प्रयत्न करू असे पासवान यांनी सांगितले.

Consumer App मध्ये मिळणार या सुविधा –
ग्राहकांना यावरून एअरलाइन्स आणि बँकिंग सह 42 क्षेत्रांच्या विरोधात तक्रार करता येणार आहे. तक्रारीची नोंद करण्यासाठी अ‍ॅपला डाउनलोड करून युजर्सला अ‍ॅप वर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. ग्राहक या अ‍ॅपच्या माध्यमातून सरकारला काही सूचना सुद्धा देऊ शकतात.

Visit : policenama.com