‘दुर्ग्धर’ आजार असलेल्या रूग्णांसाठी सरकारकडून नवी ‘स्कीम’, उपचारासाठी मिळणार 15 लाख, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकार लवकरच दुर्ग्धर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांसाठी 15 लाख रुपयांची मुदत उपलब्ध करून देणार आहे. याबाबतचा मसुदा देखील तयार करण्यात आलेला आहे. आरोग्य निधी योजनेनुसार रुग्णाला एकदा उपचारासाठी आर्थिक मदत देण्याची सोय केली गेली आहे. सरकारकडून तयार करण्यात आलेल्या मसुद्यामध्ये हा लाभ केवळ गरीब व्यक्तींसाठी न देता पंतप्रधान जण आरोग्य योजनेतील 40 % लोकांना देखील याचा फायदा मिळणार आहे. ही रक्कम केवळ सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेतल्यावरच दिली जाणार आहे.

केंद्र आरोग्य मंत्रालयाने अधिकृत वेबसाईटवर याबाबतची माहिती दिली आहे. मंत्रालय काही वैद्यकीय संस्थांना दुर्ग्धर आजारांकरिता चांगली केंद्र म्हणून सूचित करण्याची तयारी करत आहे. यामध्ये एम्स (दिल्ली), मौलाना आझाद मेडिकल कॉलेज (दिल्ली), संजय गांधी पीजी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (लखनऊ), चंदीगड पीजीआय आणि इतर चार संस्थांचा समावेश आहे.

ऑनलाइन पद्धतीने देखील जमवणार फंड
मसुद्याच्या धोरणामध्ये असे म्हटले आहे की या केंद्रांवर रूग्णांच्या खर्चाची किंमत ऑनलाईन देणगीद्वारे जमा केली जाईल. या धोरणानुसार, दुर्ग्धर आजार असलेल्या रूग्णांच्या उपचार खर्चात ऐच्छिक व्यक्ती आणि कॉर्पोरेट मदतदारांकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी सरकार डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पर्यायी निधी देणारी प्रणाली तयार करणार आहे.

2017 मध्ये देखील आखले होते धोरण
केंद्रीय आरोग्य विभागाने या आधीदेखील जुलै 2017 मध्ये नॅशनल पॉलिसी फॉर ट्रीटमेंट ऑफ रिअर डिजीज जारी केले होते. परंतु त्याबाबतच्या फंडींगमध्ये स्पष्टता नसल्याने राज्य सरकारच्या वतीने यावर आक्षेप घेण्यात आला होता. यानंतर 2018 मध्ये सरकारने याबाबतच्या पुनर्विचारासाठी एक समिती नेमली होती.

असे होते खर्चाचे आकलन
10 लाख ते 1 कोटी रूपये पर्यंत प्रत्येक वर्षासाठी 10 किलो बाळाच्या दुर्ग्धर आजाराच्या उपचारात खर्च केले जातील. भारतातील दुर्ग्धर प्रवर्गामध्ये आतापर्यंत फक्त 450 आजार सरकारी रुग्णालयात नोंदविण्यात आले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like