रेल्वे भरतीबाबत सरकारची मोठी घोषणा, घेतला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटात रेल्वेने मोठा निर्णय घेत रेल्वेच्या नवीन भरतीवर बंदी केल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी रेल्वेने एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार मागील दोन वर्षातील नवीन पदांचा आढावा घेतला जाईल आणि ५० टक्के पदं सरेंडर केली जातील. आर्थिक परिस्थिती पाहता रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

पुढील आदेशापर्यंत नवीन भरती नाही
पुढील आदेश येईपर्यंत नवीन पदांवर भरती करणार नसून सुरक्षा पदांसाठी सवलत देण्यात येईल, असे रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

तसेच रेल्वे मागील दोन वर्षातील नवीन पदांचा आढावा घेऊन ज्या पदांवर भरती झाली नाही त्या जागा रिक्त केल्या जातील किंवा ५० टक्के सुरक्षा संबंधी पदं रिक्त केली जातील.

खर्च कमी करण्याकडे रेल्वेचे लक्ष
रेल्वेने खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी नवीन भरतीवर बंदी केली आहे आणि आधीच्या पदांच्या गरजेनुसार बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच आता रेल्वे खाजगी गाड्यांकडे लक्ष केंद्रित करत असून २०२३ पर्यंत खासगी रेल्वेगाड्या सुरू होण्याची शक्यता आहे.