सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा ! स्वस्त डाळी विकण्यासाठी सरकार लवकरच उचलणार मोठे पाऊल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना संकटादरम्यान डाळींच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य लोकांचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे. भाज्या, डाळी, खाद्यतेलांसह आवश्यक वस्तूंच्या किमतींमध्येसुद्धा वेगाने वाढ होत आहे. या कारणामुळे मागील महिन्यात अनलॉक-5 लागू झाल्यानंतर अचानक मागणी आणि पुरवठ्यात मोठे अंतर आले आहे. डाळी आणि भाज्यांच्या किमतींबाबत सरकारने अनेक पावले उचलली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, डाळीच्या किमती कमी करण्यासाठी सरकार ओपन मार्केट सेल स्कीमद्वारे विकल्या जाणार्‍या डाळींवर डिस्काउंट देऊ शकते. प्राईज मॉनिटरिंग कमेटीने प्रतिकिलो 10 ते 15 रुपयांची सूट देण्याची शिफारस केली आहे.

चनाडाळ 100 रुपयांच्या पुढे

नाफेड ओपन मार्केट स्कीम सेलद्वारे डाळींचा लिलाव करते. या स्कीम अंतर्गत विकल्या जाणार्‍या डाळीवर सूट मिळू शकते. सध्या सरकार राज्य, पॅरामिलिट्री फोर्सेस आणि आंगणवाडीसारख्या ठिकाणी पाठवल्या जाणार्‍या डाळीवर सूट देत आहे, तर घाऊक बाजारात चनाडाळची किंमत 115 रुपये किलोच्या पुढे गेली आहे. दिल्लीसह अनेक मोठ्या शहरात डाळींच्या किमतीमध्ये 15 ते 20 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मागील महिन्यात चनाडाळीत 20 टक्के वाढ झाली होती. चनाडाळीशिवाय मूग आणि उडीद डाळसुद्धा 10 टक्केपर्यंत महागली आहे.

डाळींचा बफर स्टॉक 20 लाख टन केला

देशात डाळींच्या कमतरतेच्या समस्येवर उपाय तसेच त्यांच्या किमतीवर नियंत्रणासाठी सरकारने डाळींचा बफर स्टॉक 20 लाख टन करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या आर्थिक बाबींच्या समितीने ग्राहक प्रकरणांच्या विभागाद्वारे डाळींचा बफर स्टॉक 20 लाख टन करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. बफर स्टॉकसाठी 10 लाख टन डाळींची स्थानिक बाजारातून खरेदी केली जाईल, तर 10 लाख टन आयात केली जाईल.

उपलब्धतेच्या आधारावर होईल निर्णय

बफर स्टॉकसाठी डाळींचे खास प्रकार आणि त्यांच्या मात्रेचा निर्णय स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारात याची उपलब्धता तसेच किमतीच्या आधारावर केली जाईल. जर यामध्ये काही बदल झाला तर यास मंजुरी घेतली जाईल. यासाठी विभाग निधी उपलब्ध केला जाईल. भारतीय अन्न महामंडळ, नाफेड व अन्य एजन्सीज डाळींच्या खरेदी बाजारभावावर करतील आणि बाजारभाव किमान समर्थन मूल्यापेक्षा किमान असेल, किमान समर्थन मूल्यावर याची खरेदी केली जाईल.

You might also like