खळबळजनक ! मेक्सिकोमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 24 जणांचा जागीच मृत्यू

मेस्किको : वृत्तसंस्था – कोरोना संकटाचा सामना करत असलेल्या मेस्किको शहरामध्ये अज्ञातांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये 24 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मेस्कोकोच्या इरापुटो शहरात ही गोळीबाराची घटना घडली असून अनेक लोक यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच मेस्किको पोलीस आणि सैनिकांची टीम घटनास्थळी पोहचली आहे. अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर अज्ञात व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
एका महिन्यात गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 6 जून रोजी गोळीबाराची घटना घडली होती. त्यावेळी 10 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेए यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत कारवाई करण्याची मागणी केली होती.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पेक्षा जास्त जण गोळीबार करणारे असू शकतात. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु करण्यात आला आहे. अमेरिकेच्या सीमेला लागून असलेल्या या देशास ड्रग्स तस्करांचे स्वर्ग म्हणतात. त्या भागांमधून अमेरिकेसह जगातील बऱ्याच देशांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी केली जाते. स्थानिक पोलीस आणि सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत तस्करीचे प्रमाण कमी झालं आहे.