ग्रामीण भागात गुटखा विक्री जोरात !

शिक्रापुर : राज्या सह पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव,दिवसेंदिवस वाढतच आहे. शासनाकडून काही नियम देखील घालून दिले आहेत.यात पान टपरीवर,पानमसाला गुटखा विक्रीस बंदी तर नागरिकांना देखील सार्वजनिक ठिकाणी थुकंण्यास मनाई करण्यात आली आहे.माञ पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषता पुणे नगर महामार्गालगत शिरुर ,रांजणगाव, शिक्रापुर,कोरेगाव भिमा,सणसवाडी ,पेरणे फाटा,वाघोली तसेच लगतच्या सर्वच परीसरामध्ये गुटखा खुले आमपणे उपलब्ध होत आहे.त्यामुळे हे गुटखा खाणारे गुटखा बहादर खुलेआम पणे कोठेही पिचकारी मारत असतात त्यामुळे एक प्रकारे कोरोनाला निमंत्रणच म्हणावे लागेल,माञ प्रशासनाची यावर ठोस कारवाई होत नसल्यामुळे गुटखा विक्रीला प्रोत्साहन मिळत आहे .तर या बेकायदा गुटखा बरोबरच दारू व मटका देखील सुरु असल्याचे चिञ आहे ,त्यामुळे नवीन अधिकारी आल्याने परिसरातून अवैध धंदे, गुटखा हद्दपार होणार? की नाही ? असा सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

तर किराणा दुकानामध्ये देखील गुटखा सहजपणे उपलब्ध होत आहे.गुटखामाफिया, दारू व मटका धंद्यावर प्रशासनाची वचक नाही, प्रत्यक्षात पोलीस अणि अन्न प्रशसनाकडून कारवाई केली जात नसल्याची देखील चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
महाराष्ट्रात गुजरात, मध्य प्रदेश व कर्नाटक या शेजारील राज्यांतून होणारी गुटखा तस्करी सुरूच असल्याने गुटखाबंदी केवळ नावापुरतीच उरली आहे. सध्या महाराष्ट्रात गुटखाबंदी असतानाही परराज्यातून बेकायदा गुटखा येत आहे. त्याचे शालेय विद्यार्थी आणि तरुण पिढीवर गंभीर दुष्परिणाम होत आहेत. दारू, मटका यामुळे अनेक संसार उध्वस्त झाल्याची उदाहरण पाहवयास मिळत आहेत.

जर कुठे गुटखा पकडला गेला तर त्याच्या मुळा पर्यत तपास केला जात नाही .त्यामुळे गुटख्याचे मुख्य तस्कर पकडणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी पोलिसांनी अधिक सखोलपणे तपास करणे गरजेचे आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. कधी तरी पोलिसांची कारवाई केली की दोन दिवसानंर पुन्हा जैसे थे.अशी स्थिती आहे.

राज्यात २०१२ मध्ये लागू केलेल्या गुटखाबंदीला आठ वर्षे लोटली असून, प्रत्येकवर्षी बंदीमध्ये वर्षभरापुरती वाढ करण्यात येते. परराज्यातून गाड्या भरून गुटखा राज्यात आणला जात असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या चौकशीतून समोरही आले आहे. गुटखा तस्करीवर अंकुश आणण्यासाठी गाडी पकडल्यास चालकाचा परवाना आणि गाडीची नौंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, या कारवाईचाही तस्करांवर काडीमात्र परिणाम झालेला नाही. गुटखा तस्करीच्या मुळापर्यंत पोहोचून तस्करीचे रँकेट उद्ध्वस्त करणे आवश्यक आहे. अलीकडच्या काळात परराज्यांतून मोठ्या प्रमाणावर गुटखा व प्रतिबंधित उत्पादनांची राज्यात आयात करून साठवणूक होत आहे. कधी कधी हा माल पकडलाही जातो. वाहन चालकांवर कारवाई होते. परंतु सूत्रधारांना धक्का लागत नाही.

मुंबईत मटक्याचा पोश्या गुंडाळयला लावणारे अभिनव देशमुख यांची पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक पदावर नियुुुक्ती करण्याात आली आहे त्यामुळे ते आता अवैध प्रकारे चाललेल्या गुटखा विक्रीला लगाम घालणार का ?