…म्हणून ‘त्या’ इंजिनियरनं नोकरी सोडून सुरू केली चहाची टपरी

सोशल मीडियावर सध्या एका चाहवाल्या इंजिनियर तरुणाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. इंजिनियर ते चायवला अशी संपूर्ण कहाणी एका फोटो वाचायला मिळत आहे. या तरुणानं दाखवून दिलं की, कोणतंही काम लहान नसतं. आपण जे करतो त्यात आनंद शोधायला हवा.

आयएएस अवनीश शरण यांनी हा फोटो ट्विटरवरून शेअर केला आहे. फोटो शेअर करताना ते म्हणतात, “आजच्या घडीला एवढी मेहनत आणि इमानदारी कुठेही दिसत नाही. या इंजिनियर असलेल्या चहावाल्याला आपल्या कामातून आनंद मिळतो आहे.” पाहता पाहता त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.

या तरुणानं चहाच्या टपरीवर एक मेसेज देखील लिहिला आहे. तो तरुण लिहितो, “मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. अनेक कंपन्यांमध्ये मी काम केलं. कामातून पैसे मिळत होते. परंतु समाधान नाही. मला व्यवसाय करायचा होता. माझ्या टेबलवर जेव्हा नेहमी चहा येत होता तेव्हा मनासारखा नसायचा. मी आधीपासूनच चहाप्रेमी आहे. उत्तम चहा मिळावा यासाठी मी चहाचा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. हा व्यवसाय सुरू केल्यानंतर मी चहावाला इंजिनियर झालो.” असं त्यानं सांगितलं आहे.