चोरटयाकडून 11 दुचाकी, 25 मोबाईल, लॅपटॉप जप्‍त

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन – करकरे गार्डनजवळ लॅपटॉप व मोबाईल फोन विक्री करण्यासाठी आलेल्या चोरटयाला हडपसर पोलिसांनी अटक केली असुन त्याच्याकडून चोरीचे तब्बल 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. हडपसर पोलिसांनी त्याच्याकडून 11 दुचाकी, 25 मोबाईल आणि एक लॅपटॉप असा एकुण 6 लाख 30 हजार रूपयाचा ऐवज जप्‍त केला आहे.

मोहमद अन्वरे बागवान (22, रा. वरदविनायक कॉलनी, भेकराईनगर, गंगानगर, हडपसर) असे त्याचे नाव आहे. दि. 9 जानेवारी रोजी तो मोबाईल विक्री करण्यासाठी आला असता हडपसर पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये लॅपटॉप आणि मोबाईल आढळून आले.

पोलिसांनी त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने यापुर्वी अनेक ठिकाणी चोर्‍या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास सुरू केला. दरम्यान, न्यायालयाने त्याला 4 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी सखोल तपास केला असता त्याच्याकडून 11 गंभीर गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी त्याच्याकडून 11 दुचाकी, 25 मोबाईल आणि एक लॅपटॉप असा एकुण 6 लाख 30 हजार रूपयाचा ऐवज जप्‍त केला आहे.

अप्पर पोलिस आयुक्‍त सुनिल फुलारी, उपायुक्‍त प्रकाश गायकवाड, सहाय्यक आयुक्‍त सुनिल देशमुख यांच्या सुचनेनुसार आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल तांबे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शिवाजी शिंदे, हेमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रसाद लोणारे, कर्मचारी राजेश नवले, पठाण, औचारे, अनिल कुसाळकर, गणेश दळवी, भोजराव, टिळेकर, नाळे, चिवळे, शाहीद शेख आणि ज्ञानेश्‍वर चित्‍ते यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.  गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us