फक्त 7 दिवस करा ‘सुंठीच्या दूधा’चं सेवन ! ‘हे’ 6 गंभीर आजार कधी पळून जातील कळणार देखील नाही

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  तुम्हाला माहित आहे का सुंठीच्या दुधाचं सेवन केल्यास शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात. यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळं सर्दी, ताप खोकला अशा समस्याही येत नाहीत. आज आपण या संदर्भात माहिती घेऊयात.

कसं तयार करायचं सुठींचं दूध ?

– सर्वात आधी गरजेनुसार दूध घेऊन गरम करा.

– यात एक चमचा सूंठ पावडर टाका.

– आता दूध उकळून घ्या

– आता हे दूध गाळून घ्या आणि सेवन करा. याचं सेवन रात्री झोपताना केल्यास जास्त फायदा होतो.

सुंठीच्या दूधाचे फायदे-

1) ऊर्जा मिळते – जर तुम्ही व्यायाम करत असाल तर याचा खूप फायदा होतो. यामुळं शरीराला भरपूर ऊर्जा मिळते.

2) घसा खवखवणं – अनेकांना हा त्रास होतो. कधी वातावरणातील बदलामुळंही असं होतं. सुंठीच्या दूधानं यापासून आराम मिळतो.

3) थकवा, अंगदुखी – रात्री झोपताना सुंठीच्या दूधाचं सेवन केल्यास थकवा किंवा अंगदुखीची समस्या दूर होते.

4) सांधेदुखी – तुम्हालाही ही समस्या असेल तर रात्री झोपताना सुंठीच्या दूधाचं सेवन करावं. जर दूध नसेल तर तुम्ही गरम पाण्यात सुंठ आणि मध घालून त्याचंही सेवन करू शकता.

5) पचनक्रिया – सुंठीच्या दूधाच्या सेवनानं पचनक्रिया चांगली रहाते. यामुळं पोट दुखत नाही. तसं होत असेल तर आराम मिळतो. अॅसिडिटी, करपट ढेकर असा समस्यांवरही याचा खूप फायदा होतो.

6) उचकी लागणं – काहींना उचकीची समस्या असते. कितीही उपाय केला तरही फरक पडत नाही. अशावेली सुंठीचं दूध पिल्यास फायदा मिळतो.