पोटासाठी वरदान ठरते घरगुती औषधी, ‘या’ समस्यांपासून मिळते मुक्ती, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तुम्ही हिंग हे नाव ऐकले असेलच. कदाचित आपल्या घरातही ते वापरात असेल. वास्तविक, कच्च्या हिंगची चव लसणासारखी असते, परंतु जेव्हा ते एखाद्या पदार्थात शिजवले जाते तेव्हा त्याची चव अनेक पटींनी वाढते. आपण हा मसाला म्हणून वापरत असलो तरी, त्यापासून होणाऱ्या फायद्यांविषयी आपल्याला माहिती आहे का?त्याचे फार चमत्कारिक फायदे आहेत‌‌. विशेषत: पोटासाठी. पोटासाठी हिंग हे वरदानापेक्षा कमी मानले जात नाही. कारण ते पोटाशी संबंधित अनेक समस्यांवर आराम देण्याचे काम करते. अशा या बहुगुणी हिंगाचे फायदे जाणून घेऊ.

हिंग त्याच्या चमत्कारिक गुणधर्मांवर आधारित रेचक मानले जाते. वास्तविक, आयुर्वेदात त्यास रेचक म्हणतात. ते आपल्या पाचन तंत्राला शुद्ध करण्यास आणि मल विसर्जनास मदत करण्यास उपयुक्त आहे.

मुलांसाठी देखील हिंग खूप फायदेशीर आहे. त्यामुळे मुलांची पोटातील जंत होण्याची समस्या दूर होते.अन्नासह त्याचा उपयोग केल्याने मुलांचे पोट स्वच्छ राहते तसेच त्यांची उंची वाढविण्यातही मदत होते. हिंग सेवन केल्याने वायुचा त्रास कमी होतो. जर त्याचा नियमित आहारात वापर केला गेला तर तो पोटात गॅस होणे आणि अपचन या समस्येपासून निश्चितच मोठ्या प्रमाणात मुक्तता मिळते.

महिलांनीही त्याचे नियमित सेवन करावे. मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या वेदना आणि पोटदुखीपासून दिलासा मिळू शकतो.

हिंग पेनकिलर, वेदनाशामक म्हणूनही वापरता येतो. हिंगामुळे कान दुखीपासून त्वरित आराम मिळू शकतो. यासाठी एक चमचा खोबरेल तेल गरम करावे आणि नंतर त्यात हिंगाचा एक छोटा तुकडा घालावा आणि वितळवावा. जेव्हा हिंग तेलात पूर्णपणे विरघळते तेव्हा ते कानात घालावे. त्यामुळे कानाच्या दुखण्यात लवकरच आराम मिळू शकतो. तथापि, तेल फार गरम नसल्याची खात्री करावी.

हिंग पोटातील वेदना कमी करणारे औषध म्हणून काम करते. जर पोटात अचानक दुखत असेल तर अस्वस्थ होऊ नका, उलट दोन चिमूटभर हिंग घ्या आणि अर्धा चमचा पाण्यात विरघळून त्या मिश्रणात कापूस भिजवून आपल्या नाभीवर ठेवावा व झोपावे. तसेच, ते मिश्रण संपूर्ण पोटावर हलक्या हातांनी लावा. ही क्रिया आपल्याला पाच ते दहा मिनिटांत पोटदुखीपासून मुक्त करेल.