COVID-19 & Festivities : ‘कोरोना’ व्हायरसच्या काळात सण साजरे करताना ‘या’ 5 गोष्टी नका विसरू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   ऑक्टोबर महिना येताच भारतातील लोक सणांच्या आनंदायक हंगामासाठी तयार होतात. हा सणांचा हंगाम बहुतांश लोकांचा आवडता काळ असतो. या काळात लोक घरातून बाहेर पडतात, मित्र आणि नातेवाईकांना भेटतात, सणाचे खास भोजन आणि मिठाई खातात, आपल्या निकटवर्तीयांसोबत वेळ घालवतात आणि छोट्या-छोट्या आनंदाची भरपूर मजा घेतात.

आपण प्रत्येक वर्षी हे सण मोठ्या धुमधडाक्यात साजरे करतो, परंतु सोबतच स्वताची आणि कुटुंबांच्या सुरक्षेची काळजी घेतो. यावर्षी पुन्हा एकदा नवरात्रीपासून सुरू होत असलेल्या सणांचे स्वागत करण्यासाठी आपण तयार आहोत, परंतु कोरोना व्हायरस महामारीत आरोग्य आणि सुरक्षेची काळजी आणखी घेण्याची गरज आहे.

सणांच्या काळात कोरोनापासून कसा बचाव करावा ते जाणून घेवूयात…

1. सर्व प्रकारची खबरदारी घ्या

मास्क घालणे, सातत्याने हात धुणे, हँड सॅनिटायझरचा वापर आणि शारीरीक अंतर राखणे खुप गरजेचे आहे.

2. लक्षणांकडे दुर्लक्ष नको

हंगामी फ्लू किंवा सामान्य सर्दीला सामान्य आजार समजण्याची चूक करू नका. आयसोलेशन, घरीच राहाणे आणि खबरदारी घेणे खुप आवश्यक आहे.

3. अंदाज लावणे सोडा

कोरोना काळात खबरदारी घेतली पाहिजे. या व्हायरसच्या बाबतीत एखादा समज करून करणे खुप धोकादायक ठरू शकते.

4. एकमेकांना असे भेटा

मित्र किंवा ओळखीच्यांची हस्तांदोलन करू नका. लांबूनच नमस्कार करा. सणांत ही काळजी घेणे आवश्यक आहे.

5. बाहेरचे खाऊ नका

कोरोना हा शिजलेल्या अन्नातून पसरण्याबाबत कोणतीही माहिती अद्यापपर्यंत तरी उपलब्ध नाही. परंतु सणांमध्ये बाहेरचे खाणे टाळा. हे कोरोनासाठीच नव्हे तर, पोट बिघडणे आणि इतर समस्या टाळण्यासाठी आवश्यक आहे. याचा इम्यूनिटीवर थेट परिणाम होतो.