Breakfast Diet : रिकाम्यापोटी जर ‘या’ 7 गोष्टींचं करत असाल सेवन तर व्हा सावध !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सकाळचा नाश्ता खूप जरुरी आहे. यामुळे दिवसभर एनर्जेटिक वाटते. असे अनेक फूड्स आहेत, ज्यांचे सेवन आपण रिकाम्यापोटी केले नाही पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आपल्याला असे हेल्दी पदार्थ नाश्त्यात सहभागी केले पाहिजेत जे आरोग्यासाठी लाभदायक असतील. सकाळच्या नाश्त्यात कोणकोणत्या वस्तूंचा समावेश केल्याने नुकसान होऊ शकते ते जाणून घेऊयात…

1 दही, पनीर आणि ताक :

रिकाम्यापोटी दही, पनीर किंवा ताक सेवन केल्यास पोटात हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड तयार होते. म्हणून सकाळी ही दुग्ध उत्पादने सेवन करू नयेत.

2 केळी :

केळीत मॅग्नेशियम आणि पोटॅशियमची उच्च मात्रा असते, आणि रिकाम्यापोटी ते सेवन केल्यास रक्तात मॅग्नीशियम आणि पोटॅशियमचा स्तर असंतुलित होऊ शकतो. केळी आरोग्यासाठी उपयुक्त असले तरी सकाळी रिकाम्यापोटी खाऊ नयेत.

3 टोमॅटो :

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि पोषकतत्त्वे भरपूर असतात, परंतु ती रिकाम्यापोटी खाऊ नयेत. टोमॅटोमधील टॅनिक अ‍ॅसिड पोटात अ‍ॅसिडिटी वाढवू शकते. ज्यामुळे गॅसची समस्या वाढू शकते.

4 नासपाती :

नासपातीमध्ये कच्चे फायबर असते, रिकाम्यापोटी खाल्ल्यास नाजूक श्लेष्माचे नुकसान होते.

5 आंबट फळे :

आंबट फळांमध्ये फ्रूट अ‍ॅसिड असते. रिकाम्यापोटी सेवन केल्याने गॅसची समस्या वाढते.

6 काकडी :

यात अमीनो अ‍ॅसिड भरपूर असल्याने पोट फुगणे आणि पोटदुखीसारख्या समस्या होतात.

7 चहा आणि इतर कॅफीनयुक्त पेय :

रिकाम्यापोटी चहा सेवन केल्याने संपूर्ण दिवस अ‍ॅसिडिटी आणि अपचनाची समस्या होऊ शकते. ही पेय अन्नपचनासाठी आवश्यक पित्त आणि अ‍ॅसिड कमी करते.