‘विपरीत-करणी’ डायबिटीजच्या रूग्णांसाठी वरदान, जाणून घ्या पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन – विपरीत-करणी आसन केल्याने डायबिटीज रूग्णांना चांगला आराम मिळतो. ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहाते. जर तुम्हाला सुद्धा डायबिटीज असेल आणि ब्लड शुगर लेवल कंट्रोल करायची असेल, तर दररोज विपरीत – करणी आसन जरूर करा. विपरीत – करणी आसन करण्याची पद्धत आणि फायदे जाणून घेवूयात –

विपरीत – करणीचे फायदे
1 मेटाबॉलिक हालचालीत सक्रियता येते.
2 ग्रंथी तसेच हार्मोन्स संतुलित करण्यात मदत मिळते.
3 ब्लड शुगर नियंत्रित राहाते.
4 शरीराला आराम मिळतो.
5 डोकं शांत राहाते.
6 स्ट्रेस हार्मोन कमी झाल्याने तणाव कमी होतो.

कसे कराल हे आसन
जमीनीवर भिंतीच्या आधाराने पाठीवर झोपा. आता दोन्ही पाय भिंतीला लावा, जसे छायाचित्रात दिसत आहे. या दरम्यान तुमचे शरीर 90 डिग्रीच्या मुद्रेत असावे. आपले हात बाजूला ठेवून आराम अनुभवा आणि सुमारे 15 मिनिटे दिर्घ श्वास घ्या. यानंतर आपले पाय दुमडून पहिल्या मुद्रेत या