ColdZyme mouth spray : ‘हा’ माऊथ स्प्रे 20 मिनीटांमध्ये 98 टक्क्यांपर्यंत कोरोना व्हायरसचा करू शकतो ‘नाश’, रिसर्च

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसवर मात कशी करावी ? हा देश आणि जगासाठी एक मोठा प्रश्न आहे. भारतात गेल्या तीन महिन्यांत कोरोना संक्रमितांचा आकडा 11 लाखांवर पोहोचला आहे. जगभरातील डॉक्टर आणि वैज्ञानिक या प्राणघातक आजारावर मात करण्यासाठी लस शोधण्यात गुंतले आहेत. दरम्यान, ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाची लस चाचणीत सुरक्षित आणि प्रतिकारशक्तीसाठी मजबूत करण्यात सिद्ध होत आहे. मात्र, आता ही लस लोकांपर्यंत कधी आणि कशी पोहोचावी हा एक मोठा प्रश्न आहे.

या सर्वादरम्यान कोरोना महामारी निर्मूलनाविषयी स्वीडिश लाईफ सायन्स कंपनी Enzymatic कडून मोठा दावा केला जात आहे कि, ते कोल्डझाइम माऊथ स्प्रेने 20 मिनिटांत कोविड – 19 च्या 98.3 टक्के विषाणूला संपवू शकतो. Enzymatica कंपनीने 20 जुलै रोजी जगभरातील कोरोना साथीचा रोग संपवण्यासाठी संशोधन केल्यानंतर प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला. अहवालात म्हटले आहे की सार्स-कोव्ह – 2 सोबतच कोल्डझाइम माउथ स्प्रे 20 मिनिटांत कोविड – 19 च्या 98.3 टक्के विषाणूचा नाश करू शकेल. कोल्डझाइम माउथ स्प्रे ताप, तसेच खोकला सर्दी देखील बरे करतो, असे अहवालात म्हटले आहे. मायक्रोबॅक प्रयोगशाळा इंक या अमेरिकन कंपनीने हा अभ्यास केला आहे.

दरम्यान, यापूर्वीही रशियाने कोरोना लस बनवण्याचा दावाही केला आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देश या प्रयत्नात दिवसरात्र काम करत आहेत. आतापर्यंत जगभरात कोरोना विषाणूची साथीची 14,673,223 प्रकरणे आढळली आहेत. त्याच वेळी, 609,596 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर या साथीने 8,758,066 लोक बरे झाले आहेत. त्याचबरोबर भारतात आतापर्यंत कोरोनाची सुमारे 11 लाख प्रकरणे समोर आली आहेत.