‘साबण’ आणि ‘टूथपेस्ट’मुळं होऊ शकतो ‘हा’ धोकादायक आजार !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : साबण आणि टूथपेस्ट आपल्या डेली रुटीनमध्ये कामात येणाऱ्या अश्या गोष्टी आहे, ज्यांचा आपण साफ- सफाईसाठी वापर करतो. त्याचा वापर करताना एक क्षणभरसुद्धा आपल्या मनात विचार येत नाही कि, यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार महिलांमध्ये या गोष्टींचा वापर केल्यास ऑस्टिओपोरोसिस रोग होण्याची शक्यता वाढते. रिपोर्ट्सनुसार, ट्रायक्लोझन नावाचा घटक ग्राहकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये ऑस्टिओपोरोसिस होतो. दरम्यान, स्त्रियांमध्ये कॅल्शियम नसल्यामुळे या रोगाचा धोका असतो, परंतु संशोधनात असे दिसून आले आहे की ज्या स्त्रिया टूथपेस्ट, अँटीबैक्टेरियल साबण किंवा अशा उत्पादनांचा वापर करतात त्यांना ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता जास्त असते.

यासंदर्भात चीनच्या मेडिकल कॉलेजच्या यिनजुंग ली यांनी माहिती दिली की, प्रयोगशाळेत अभ्यासानुसार प्राण्यांच्या बोन मिनरल डेंसिटीवर या गोष्टींचा परिणाम खूपच वाईट असल्याचे आढळले. दरम्यान, ट्रायक्लोसनचा मानवी हाडांवर किती परिणाम होतो याबद्दल फारशी माहिती आढळली नाही. या संशोधनात असेही दिसून आले आहे की, ज्या स्त्रियांच्या युरिनमध्ये ट्रायक्लोसन जास्त प्रमाणात आढळले जाते, ते हाडांशी संबंधित समस्यांसह झगडत असल्याचे आढळले आहे. या व्यतिरिक्त, इतर काही संशोधनात असे दिसून आले आहे की, ट्रायक्लोसनचा परिणाम थायरॉईड आणि रिप्रोडक्टिव सिस्टमवर देखील होतो. परंतु ऑस्टिओपोरोसिस ट्रायक्लोसानमुळे होतो, ही वस्तुस्थिती अद्याप पूर्णपणे सिद्ध झाली नाही.

ऑस्टिओपोरोसिस :
ऑस्टियोपोरोसिस हा एक आजार आहे जो बहुतेक 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये होतो. या रोगात, हाडांचे वजन मोठ्या प्रमाणात कमी होते आणि ते मजबूत देखील राहत नाही. हाडे इतकी कमकुवत होतात की एखादा रुग्ण शिंकल्यावर सुद्धा तुटू शकतात.