Coronavirus & TB : ‘कोरोना’ व्हायरस आणि TB मध्ये काय ‘कनेक्शन’, जाणून घ्या ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आरोग्य मंत्रालयाने सर्व टीबी रूग्णांची कोविड-१९ चाचणी करण्याची शिफारस केली आहे आणि कोविड-१९ पॉझिटिव्ह रूग्णांची टीबी चाचणीही केली जाईल.

क्षयरोग झालेल्या व्यक्तीला कोरोना विषाणू संसर्ग होण्याचा धोका २.१ पट वाढतो. डब्ल्यूएचओने जारी केलेल्या भारताच्या टीबी अहवाल २०२० मध्ये असे दिसून आले आहे की, २०१९ मध्ये टीबीचे २६.९ लाख रुग्ण देशात आढळले, जे जगात सर्वात जास्त आहेत. कोरोना विषाणू महामारी येण्यापूर्वी भारत सरकारने जागतिक स्तरावरील निश्चित लक्ष्यापेक्षा पाच वर्षाअगोदर २०२५ पर्यंत टीबीचे निर्मूलन करण्याचे लक्ष्य ठेवले होते.

क्षय रोग म्हणजे काय?

कोविड-१९ सारखे क्षयरोग एक संसर्गजन्य आजार आहे, जो प्रामुख्याने फुफ्फुसांवर हल्ला करतो, मात्र तो मेंदू आणि मणक्यांसह शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो. टीबी एका प्रकारच्या जिवाणूमुळे होतो, ज्याला मायकोबॅक्टीरियम क्षयरोग म्हटले जाते.

आरोग्य मंत्रालयाने बुधवारी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करत म्हटले की, अभ्यासात असे दिसून आले आहे की टीबीच्या रुग्णांना SARS-CoV-2 म्हणजे कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका वाढतो. मंत्रालयानुसार, विविध अभ्यासात कोविड-१९ च्या रूग्णांमध्ये टीबीचे प्रमाण ०.३७ ते ४.४७ टक्के आढळले आहे.

कोविड-१९ आणि टीबीमध्ये काय संबंध आहे?

दोन्ही रोग प्रामुख्याने फुफ्फुसांवर हल्ला करतात. तसेच टीबी आणि कोरोना विषाणूने संक्रमित लोकांमध्ये खोकला, ताप, श्वास घेण्यास अडचण यासारखी लक्षणे दिसून येतात. डब्ल्यूएचओनुसार, दोन्ही जैविक घटक प्रामुख्याने जवळच्या संपर्कातून पसरतात, टीबीच्या संपर्कात आल्याने उष्मायन कालावधी सहसा सुरुवातीला होतो.

टीबीमुळे कोरोना व्हायरसचा धोका वाढतो का?

खरं म्हणजे, जर फुफ्फुसांमध्ये आधीपासूनच टीबीसारख्या रोगाचा संसर्ग असेल, तर कोरोना विषाणूची लागण होणे सोपे होते. अद्याप याबाबत कोणताही डेटा उपलब्ध नाही, पण वैद्यकीय तज्ञांनी इशारा दिला आहे की, जे टीबीचे रुग्ण आहेत त्यांना कोरोनासह इतर संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

टीबीचे रुग्ण कोरोनाचा धोका कसा कमी करू शकतात?

एखाद्याला टीबी आहे की नाही. पण सर्वांनी कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जसे-

शारीरिक अंतरः लोकांपासून कमीत कमी ६ फूट अंतरावर रहा.

हात धुवा: साबण आणि पाण्याने कमीत कमी २० सेकंद दिवसातून अनेक वेळा हात धुवा.
हात न धुता तोंडाला स्पर्श करू नका.

जे आजारी आहेत किंवा त्यांच्यात लक्षणे आहेत, त्यांना भेटले टाळा.
मास्क घाला.

कोविड-१९ टाळण्यासाठी खबरदारी घेण्यासह टीबीच्या रूग्णांनी त्यांच्या नियमित उपचार प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे आणि त्यांच्या डॉक्टरांकडून सल्ला घेतला पाहिजे.