वारंवार ‘ढेकर’ येणं चांगलं लक्षण नाही, पाडू शकतं ‘आजारी’, ‘या’ मार्गानं व्हा मुक्त, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जेवणानंतर ढेकर येणे सामान्य आहे. परंतु हा ढेकर एका तासात बर्‍याच वेळा आल्यावर त्याकडे दुर्लक्ष करणे आपल्यास योग्य ठरणार नाही. ढेकर आल्यानंतर बरेच लोक जास्त जेवण केल्याने आणि फिरायला गेललो नाहीत म्हणून असे होते, म्हणत त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु ही गोष्ट आपल्यासाठी गंभीर समस्या निर्माण करू शकते. त्यासाठी आपण वेळेवर डॉक्टरांशी संपर्क साधावा. जाणून घेऊया ढेकर येण्याच्या कारणांबाबत …

ढेकर येण्याची कारणे :

– जास्त खाणे
– पोटात संक्रमण
– अपचन
– वेळेवर न जेवणे
– धूम्रपान
– तणाव
– मसालेदार अन्न

ढेकरमुळे होणारे आजार

– ढेकर प्रतिबंधामुळे श्वसन रोग होऊ शकतो
– यामुळे शरीरात कंप पावू शकतो.
– पाचक प्रणाली देखील योग्यरित्या कार्य करणे थांबवू शकते.
– फुफ्फुसांचे कार्यही संथ होऊ शकते, ज्यामुळे हृदयाच्या ठोक्यातही गडबड होऊ शकते.
– शरीरात गॅस तयार होऊ शकतो ज्यामुळे डोकेदुखी इत्यादी समस्या देखील उद्भवू शकतात.
– ढेकर देणे थांबवून पोटातही जडपणा जाणवू शकतो.

ते टाळण्याचे मार्ग

– दिवसभर हलके खावे जेणेकरून आपल्या शरीरावर जास्त गॅस तयार होऊ नये.
– फक्त हलके कोमट पाणी प्या. थंड पाणी अजिबात पिऊ नका.
– योगामुळे शरीरात गॅस तयार होत नाही.
– तळलेले आणि भाजलेले अन्न खाणे टाळा.

ढेकर देणे थांबवण्यासाठी घरगुती उपचार

– पुदीना

ढेकर आल्यावर आपण पुदीना वापरू शकता. यात स्नायूंना आराम देणारे गुणधर्म आहेत जे पाचक मार्गात आराम देतात आणि पोटात तयार होणारा गॅस कमी करतात. हे पित्तचा प्रवाह सुधारते आणि पचन सुधारते, ज्यामुळे ढेकर येणे कमी होते. यासाठी एक चमचा कोरडी पुदिन्याची पाने घ्या आणि ते एक कप गरम पाण्यात टाकून ते 10 मिनिटे उकळवा आणि नंतर ते पाणी फिल्टर करून दिवसातून दोन ते तीन वेळा प्या.

अदरक

ढेकर निर्माण करणाऱ्या गॅसशी संबंधित समस्यांवर प्रभावीपणे उपचार करण्यात अदरक खूप फायदेशीर आहे. त्यात अँटी – बॅक्टेरिया, अँटी- इंफ्लामेट्री आणि वेदना कमी करणारे गुणधर्म आहेत. यासाठी ताज्या आल्याचा छोटा तुकडा चावून घ्या.

– पपई

पपईमध्ये एक असे एन्जाइम असते, जे बॅक्टेरियांना वाढण्यास प्रतिबंधित करते आणि पचन सुधारते. पपई हा ढेकर आणि छातीत जळजळ होण्याचा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. आपण दररोज पिकलेली पपई खाऊ शकता किंवा स्मूदी बनवून प्यावे.

– केळी

केळीमध्ये उच्च प्रमाणात फायबर असते, जे पचन सुधारते आणि ढेकर कमी येते. जर तुम्हाला वारंवार ढेकर येत असेल तर केळी खा पण दिवसात एकापेक्षा जास्त केळी खाऊ नका.