तुम्ही तुमच्या ‘सुस्त’, ‘अशक्त’, ‘शांत’ मुलांना खाण्यासाठी द्या ‘या’ 10 गोष्टी, शरीरातील ‘रक्त’ आणि ‘ताकद’ झपाट्यानं वाढेल

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – खराब खाणेपिणे यामुळे मुलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत चालला आहे. आहार चांगला नसल्यामुळे मुलांना अनेक आजारांना सामोरे देखील जावे लागते. यामुळे काही मुलांना लगेच थकवा जाणवू लागतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या मुलांना ताकतवर आणि निरोगी ठेवायचे असेल तुम्ही आजपासूनच त्यांना पुढील पदार्थ खाण्यासाठी द्या.

दही
आपण आपल्या मुलाला दररोज दही खायला द्यावे. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, हे पोटात चांगले बॅक्टेरिया वाढवते. तुम्ही तुमच्या मुलांना साधे ग्रीक दही देऊ शकता, ज्यामध्ये साखर कमी असते आणि प्रथिने जास्त असतात. त्यात कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

बीन्स
बीन्सला सुपरफूड्स म्हणतात. त्यामध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असते.छोट्या मुलांना तुम्ही चणे खायला घालू शकता. हे शरीरातील प्रथिनांची कमतरता दूर करते आणि स्नायूंच्या विकासास सुधारित करते. 4 ते 8 वयोगटातील मुलांना दिवसाला सुमारे 25 ग्रॅम फायबरची आवश्यकता असते. बीन्स फायबरचा स्त्रोत देखील आहेत.

Image result for बीन्स

अंडी
एका मोठ्या अंड्यात सहा ग्राम प्रोटीन असते आणि विटामिन डी, विटामिन बी आणि आयरन देखील मोठ्या प्रमाणावर असते. ज्यामुळे लहान मुलांची बुद्धी तल्लख होते. त्यामुळे मुलांना तुम्ही उकडलेली अंडी किंवा ऑम्लेट देऊ शकता.

Related image

अवोकेडो
यामुळे हेल्दी फॅट वाढते. तुम्ही हा पदार्थ टोस्टसोबत खाऊ शकता तसेच सलॅड म्हणून देखील खाऊ शकता. यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण उत्तम होते.

Image result for अवोकेडो

गोड बटाटा
ही जीवनसत्त्वे, फायबर आणि पोटॅशियमचे भांडार आहे. हे रक्तदाब नियंत्रित करण्यात आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळे शरीराची दुर्बलता दूर होते आणि रक्त तयार होते. आपण त्यांना उकळू शकता किंवा भाजून देखील घेऊ शकता.

दूध
दुधाचे अनेक फायदे आहेत यामुळे हाडे मजबूत होतात. जर मुलांना दूध प्यायला आवडत नसेल तर तुम्ही त्यांना दुधापासून बनलेले पदार्थ खायला घालू शकता तसेच चॉकलेट पावडरचा वापर करून देखील मुलांना दुधाची गोडी लावू शकता.

Image result for दूध

नट्स
सुका मेवा मुलांसाठी खूप महत्वाचे आहेत. अक्रोड, बदाम, काजू, पिस्ता इत्यादी गोष्टी मुलांना द्याव्यात. मुलाच्या मेंदूच्या विकासासाठी त्यांना ड्राय फ्रुट्स खाण्याचा सल्ला दिला जातो.

Image result for नट्स

धान्य
मुलांची उंची वाढवण्यासाठी धान्यापासून बनलेली पोळी खाणे मुलांसाठी खूप फायद्याचे ठरणार आहे. यामुळे मधुमेह आणि वजन वाढणे अशा विकारांपासून मुले दूर राहतात.

बेरी
एक कप बेरीमध्ये 4 ग्रॅम फायबर असते आणि त्यात व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडेंट्ससारखे घटक असतात. ब्लूबेरी, ब्लॅकबेरी आणि स्ट्रॉबेमध्ये साखरेचे प्रमाण बर्‍याच फळांपेक्षा कमी आहे. मुलांसाठी ताजे बेरी एक चांगले स्नॅक आहे,जे दह्यासोबत देखील खाल्ले जाऊ शकते.

पालेभाज्या
आहारात रोज थोड्या प्रमाणात का होईना हिरव्या पालेभाज्या असणे खूप गरजेचे आहे. यामुळे मुलांचे आरोग्य निरोगी राहते तर मुलांना अनेक प्रकारचे विटामिन देखील यामधून मिळते. म्हणून आहारात नेहमी हिरव्या पालेभाज्या ठेवाव्यात.

फेसबुक पेज लाईक करा –