पुढच्या 3 तासात पुणे, रायगड, नाशिकसह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता : IMD

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हवामानात सध्या सातत्याने बदल आहे. कधी उष्णता जाणवत आहे तर कधी थंडी तर कधी जोरदार पाऊस येत आहे. परंतु, आता भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील रायगड, पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, औरंगाबादमध्ये येत्या 3 तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, पुणे वेधशाळेने देखील आपल्या अंदाजात 21 जुलैरोजी कोकणसह गोव्यात अनेक ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.