Hingoli Crime News | बी.ए.प्रथम वर्षात नापास झाल्याने 19 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – Hingoli Crime News | सध्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. थोडेसे अपयश आले तर हे विद्यार्थी पुढचा मागचा विचार न करता टोकाचा निर्णय घेत आहेत. अशीच एक आत्महत्येची घटना हिंगोलीमध्ये घडली आहे. यामध्ये 19 वर्षीय विद्यार्थिनीने बि.ए. प्रथम वर्षात नापास झाल्याने औषध प्राशन करून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. (Hingoli Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

समीक्षा राजू नादरे (वय 19), असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. ती वसमत तालुक्यातील गिरगाव येथील रहिवाशी होती. या घटनेची माहिती मिळताच तिला तातडीने नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. समीक्षा बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. परीक्षेत काही विषयांत नापास झाल्यामुळे तिला नैराश्य आले होते. (Hingoli Crime News)

याच नैराश्यातून समीक्षाने शेतातील फवारणीचे औषध पिऊन आत्महत्या केली आहे. या घटनेबाबत राजू तुकाराम नाचरे यांनी कुरुंदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कुरुंदा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे नादरे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title :- Hingoli Crime News | hingoli 19 year old student takes her life after failing in exams

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhatrapati Sambhajinagar Crime News | सैराटची पुनरावृत्ती ! प्रेमप्रकरणातून एका 16 वर्षीय युवकाचा खून

Apla Pune Cyclothon | पुनीत बालन ग्रुप आपलं पुणे सायक्लोथॉन रविवारी (5 मार्च)

Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यात भाजपचा पराभव करणारे रवींद्र धंगेकर आहेत तरी कोण? जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

Rakhi Sawant | राखी सावंतच्या आयुष्यावर भाष्य करणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; राखी सावंतची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव गुलदस्त्यात

Pune Kasba Peth Bypoll Election Result | कसबा भाजपच्या हातून निसटला, काँग्रेसने गुलाल उधळला; जाणून घ्या कोणाला किती मते पडली